Sunday, 14 June 2015

एक गोष्ट त्यांची पण - भाग ४

एक गोष्ट त्यांची पण - भाग ४ 

थोडेसे पूर्वीचे 
"निमिष प्लीज , हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला  यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . न आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये  मला आकाश ?",- इरा न राहवून आतून बाहेर आली 
"काही नाही ग , आमचे गुपित आहे ते "- निमिष 
"पण ते माझ्या बद्दल , म्हणजे माझे नाव आले तुम्ही बोलताना ,  मला कळलाच पहिजे "- इरा 
"बर बाई , सांगतो, अग ,  आकाश मला सांगत होता कि , सांगू का आकाश ?"
"ए अरे निमिष , काय ठरलाय आपले , मग गप्पा बैस न "
"अरे , सांगतो रे , तशी पण ती शेरलॉक  ची fan  आहे , काळजी नको करो , मी सांगतो तिला , समजून घेईन ती "
"ए आता , पाल्हाळ नका  लावू तुम्ही दोघे , निमिष सरळ सांग  मला , नाही तर … मी बोलणार नाही , नको त्या पेक्षा लग्न cancel "
"अग  ए , सांगतो बाबा आकाश . अग  आकाश म्हणत होती म्हणजे सांगत होता कि त्याला किती गर्लफ्रेंड आहेस , म्हणजे आता कुणाचा नंबर आहे वगैरे . तुला आवडणार नाही म्हणून तुला सांगत नव्हतो आम्ही "
"अच्छा , म्हणजे दादुला खूप  गर्लफ्रेंड  आहेत , काय रे तुम्ही मोठे झालात आणि मी बालवाडी छोटा गट  का रे अजून  "
"म्हणजे , तुला काय म्हण्याचाय "- आकाश 
"ए हे बघ आकाश , तुला एखादी मैत्रीण असेल हि , म्हणजे तशी  खास किंवा जवळची पण असेल , more  than friend  वगैरे , पण आता हा विषय नव्हता . आणि यात माझ्या पासून  लपवण्या  सारखे काय आहे . नसेल सांगायचे तर नको सांगू , मी जाते परत "
"इरा , आता म्हणालीस ना  ग  कि बालवाडी मध्ये नाहीये आणि अजून तशीच चिडतेस , इडूली -चीडूली  सारखी . मीच सांगतो काय झाले , आम्हाला अनुचे आई बाबा भेटले . समोर आले , मग बोलावे लागल"- आकाश 
"नेमकी , नको ती माणसे भेटतात तुला आणि ज्यांना भेटायला पाहिजेस ते मात्र …"- इरा 
"इरा , हा विषय  आता इथेच बास. तस पण नमस्कार कसे आहात इतकाच बोलणे झाले.  बर तू इथे कशी आता "- आकाश 
"अरे , विनिता  मावशीने तुमच्या साठी डबा  दिला आहे .  ते खावून घ्या आणि आराम करा जरा . मग परत येते मी , जमले तर आई बाबा पण येतील "
इरा गेली . निमिष ला वाटले कि आकाश नि खरे सांगितले , पण किती शांत पणे  आणि विषय हि बदलला , पण ते आता भेटायला नको होते . आता त्याच्या डोक्यात परत , अनु , ठरलेले आणि मोडलेले लग्न , आणि सगळेच दुष्ट चक्र . हा इरा पासून काही सुद्धा लपवून ठेवत नाही , पण अनु बद्दल चे त्याचे गुपित मात्र  त्याने लपवून ठेवले आहे . आणि  कुणालाच ते इराला सांगता येणार नाही . त्या भाबड्या पोरीला  एक प्रकारे आपण फसवतो आहे का ? पण  तिच्या आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचे आणि सुखाचे आहे ते 
निमिष चे खरे होते , अनु चे आई बाबा भेटले आणि आकाश भूतकाळात गेला म्हणजे ओढला गेला . त्याच्या  आवडीचे पदार्थ असूनही , त्या चवी पेक्षा , आठवणीची चव कटू होती बहुतेक 
अनु , आकाश आणि निमिष वर्ग मित्र . म्हणजे अनु तशी त्यांची काही खास मैत्रीण नव्हती . पण मैत्रीण होती . तिला आकाश आवडत होता आणि तिला बरोबर माहित  होते कि आकाश ला आपल्या बद्द्दल अगदी आपणहून प्रेम नाही जाणवले तरी त्याला कसे आपले से करायचे ते . तशी ती  हुशार होती , महत्वाकांक्षी  होती ,  आणि चांगली होती , सगळ्यांच्यात मिळून मिसळून .  आकाश च्या घरी तिचे येणे - जाणे  होते . आणि आकाशाच्या आईची ती  fan  होती . तिला त्यांच्या सारखे व्ह्यायचे होते , डॉक्टर . आकाशच्या घरी पण  ती छान मिसळलि  होती , आकाशाचे आई बाबा , आजी आणि इराला  पण ती आवडायची . पण आकाश च्या मनात काय होते ते मात्र तिला कळा नव्हते .  तिने पण ठरवले कि आधी शिक्षण आणि मग बघू .  आकाशाला डॉक्टर व्हायचे  कि नाही हे पण तिला माहित न्हवते . खर तर आकाश - निमिष -इरा हे त्रिकुट होता आणि ते त्याचा  चौकोन करायला तयार न्हवते , म्हणजे मुद्दामून नाही , पण त्यांचे गुळ पीठ छान जमले होते  म्हणून अनुला घीस्खोरी करता येत न्हवती . अनु च्या गप्पा असायच्या पण आकशा पेक्षा इरा सोबत किंवा आकाशाच्या आई सोबत 
"अनु, तुला पण डॉक्टर च व्हायचे आहे न ग ?"- शाळेत जाणारी इरा , अनुला विचारात होती 
"हो ,. आणि मला पण म्हणजे तुझा दादू पण डॉक्टर होणार वाटते "
"त्याचे तसे ठरले नाहीये अजून , पण माझे ठरलय , मी डॉक्टर होणार आणि अगदी आई सारखीच. दादू म्हणतो मला कि तू काय बाई  होशील , हुशार आहेस  " 
"मग आहेसच कि तू हुशार , आकाश चे बरोबर आहे "
"खर सांगू का तुला अनु , आकाश जास्त हुशार आहे , त्याचे प्रेम आहे न खूप माझ्या वर , म्हणून त्याला वाटते कि आपली बहिण लई भारी . पण मला ना कधी कधी वाटते त्याच्या सारखे व्हावे . एकदम कुल आणि हुशार आणि मस्त एकदम . :). त्याचे राहू दे , तू डॉक्टर झालीस न कि आमच्या हॉस्पिटल ला च ये , मग थोड्या वर्षांनी मी पण येयीन आणि मग मस्त बघ एकदम . रोज भेटू आपण ."
"पक्का इरा , नक्की असाच करू . आकाश आला तर माझा निरोप सांगशील न त्याला आणि निमिष ला पण संग म्हणव . चल भेटू परत , बाय "
"हो मी सांगेन त्यांना तुझा निरोप , बाय "
आकाश नि रिसर्चला जायचे ठरवले  आई बाबान विशेष पसंत नव्हते ,पण तेवढी मोकळीक होती त्यांच्या घरात. इराला मात्र आपला भाऊ डॉक्टर च व्हयला हवा होता म्हणजे त्यांना एकत्र practice  करता आली असती . निमिष चा घराचा व्यवसाय होता आणि त्याला लहान पण पासून त्यात रस होता , म्हणून त्याने engg  ला प्रवेश घेतला . अनु मात्र डॉक्टर च होणार होती आणि तिनी तीच वाट निवडली . पण कसे कुणास ठावूक हे ऋणानुबंध टिकले . 
आकाश , पुण्यात येवून जावून असायचा , पण अनु नि मात्र घरी येणे -जाणे  ठेवले होते आणि आकाश ला पण ती अधून मधून भेटायची . तिला मनापसून आवडला होता तो आणि हळू हळू हे सगळ्यांच्या लक्षात येत होते . तिच्या आई वडिलांना आणि आकाशाच्या पण . त्यांना सगळ्यांना हे मान्य होते , आता प्रश्न होता आकाशाचा , त्याला लगेच विचारण्यात अर्थ नव्हता , त्यामुळे कुणीच  काही करू शकत नव्हते . 
इरा पण बारावी नंतर मेडिकल  ला गेली . आणि बघता बघता आणि दोन वर्षे निघून गेली . अनु नि आकाशच्या आई ला जोइन केले . आता आकाशाला विचारावे असे सगळ्यांना वाटत होते , पण कसे . म्हणजे आकाश चे काही सांगता येत नाही , त्याचे ठराविक मित्र मंडळ आहे , आणि कुणी मुलगी त्याच्या आयुष्यात नाही , पण अनु बद्दल तो असे काही व्यक्त झाला  नाही , असे आकाशच्या आई ला वाटत होते . मग परत इराच मध्ये पडली , 
" आई , मी विचारते ग त्याला , हळूच  गप्पा मारताना "
"झाले , तू विचारणार म्हणजे , तो आणखी आम्हालाच ओरडेल . इतक्या लहान मुलीचे बघ काय चाललाय , तुमचे लक्षच नाहीये घरात , इरा बघा काय बोलतीय , एवढीशी आहे …. "
"ए आई त्याचे पुरे , आता मला बॉय फ्रेंड असेल अश्या वयात आहे मी , लहान थोडी न आहे . तू नको काळजी करू मी आणि घेते त्याला घोळात . आणि तसा हि त्याला जर दुसरे कुणी आवडत नसेल आणि समज अनु वर त्याचे प्रेम नसेल , तरी चांगली मुलगि आहे ती , त्यांच्या आवडी निवडी पण सारख्या आहेत आणि आपल्याला आवडते कि ती आणि मला पण पसंत आहे , हवे असेल तर फक्त साखर पुडा करू आता , "
"इरा , तुझी स्क्रिप्ट तयार आहे कि अगदी , आणि मुद्दे सूद . ठीक आहे मी बाबा आणि आजी शी बोलते , तो पर्यंत काही गडबड  नको करू . आकाश हो म्हणला  तर बराच होईल बाई . मुलगी पण चांगली आहे आणि मला हॉस्पिटल मध्ये पण घराचच माणूस होईल "
"हो न , आणि काही वर्षांनी मी पण असेंच कि , आपण सगळेच घराचे , मस्त न. ए आम्ही दोघी पण तुअम्च्य सारखे कॅम्प  घेणार, मम्मा , मला न अगदी तुझ्या  सारखे व्हायचे आहे , लोक म्हणतील बघ कि आई सारखीच आहे अगदी इरा म्हणून  "
"इरा , आधी डॉक्टर तो हो मग पुढचे पुढे आणि झोपायला जा आता "
कसे काय माहित पण , इरा नी , आकाश ला  पटवले . म्हणजे तसा तो  अनुच्या प्रेमात वगैरे न्हवता , पण अनु चांगली मुलगी होती , तो तिला ओळखत होता आणि मुख्य म्हणजे घरच्यांना पसंत होती , पण त्याला लगेच लग्न करणे शक्य न्हवते , कमीत कमी वर्ष भर तरी , पण तो हो म्हणाला 
इरा खूप खुशीत होती , साखर पुड्या ची तयारी करायला तिने आई ला खूप मदत पण केली होती . अनु सोबत आणि आकाश सोबत तिने खूप खरेदी पण केली होती . साखरपुडा छान झाला आणि नाते पक्के झाले . आकाश अधून मधून मुंबई हून पुण्यात येत असे . आणि आला कि , 
"इरा , चल  , बाहेर जायचय , अवर लवकर , तू मी अनु आणि निमिष "
"ए तुम्ही जा न , मला  नाही जमणार रे , तुमचे काय बाबा , आता तुम्ही बर्या पैकी सेट आहात , माझे अजून शिक्षण नाकी आहे . खरच नाही जमणार , खूप अभ्यास आहे "
"इरा , तुला विचारून ठरवले होता न , तेव्हा तर नाचत नाचत हो  म्हणालीस , आता काय झालाय , आणि तुला दुसरे काही काम नाहीये , तुला बरे वाटतय न "
"हो रे , वाटतय आणि खर तर मला माझ्या फ्रेंड्स सोबत जायचंय , प्लीज . "
"ठीक आहे , हे बघ निमिष चा प मेसेज आलाय , नाही जमणार म्हणून , काय यार तुम्ही लोक . इतक्या दिवसांनी आलोय मी आणि तुम्हाला वेळच नाहीये ,"
"दादू , हे बघ उद्या चा वेळ  तुझ्या साठी म्हणशील तेव्हा , पण आता जा तू , ती अनु वाट बघत असेल ,म्हणजे प्यार भर इंतजार ………।  हे झार , लवकर जा आणि तिचा इंतजार खत्म कर "
"इरा , फालतू बडबड बंद कर , उद्या बघतो तुला "
आकाश गेला . इरानिच निमिष ला पण  बेत cancel करायला सांगितले होते . तिला असे वाटत होते कि दादांनी फक्त अनुला असा पण वेळ द्यावा . आणि तिने तसे आई ला बोलून दाखवले आणि आई ला लगेच पटले , ती इराला म्हणाली सुद्धा कि मीच आकशा ला सांगणार होते ,. इतके दिवस ठीक होते , आणि तू पण आता मोठी झालीयेस कि तुला पण तुझे जग आहेच कि . आणि एक दिवशी तू पण जाशील कि या घरातून , मग काय करेल हा कि तुझ्या मागून याला पण पाठवयाचे . इरा फक्त हसली , तिला खर तर आकाश ला खूप  काही सांगायचे होते , आई जरी म्हणाली कि तुझे आता एक वेगळे जग आहे तरी , तरी आकशचे आणि तिचे असे एक वेगळे जग होताच कि . तिला वाटले , आई म्हणेल कि ग असे काही नाही अनु ला जसा वेळ देईल तो तसा तुअल पण देईल कि आणि आई अलीकडे एक दोन वेळा आपल्याला म्हणाली पण कि तू पण जाशील कि एक दिवस हे घर ,सोडून  म्हणजे लग्न झाल्यावर . हे काय आता नवीनच , पहिले शिक्षण आणि मग बाकी सगळे , अगदी हॉस्पिटल सुद्धा , असे म्हणणारे आई बाबा , हे काय एकदम . कदाचित दादू चे लग्न ठरल्या मुळे  आम्ही मोठे झालाय असे वाटतय  त्यांना :)
इरा , जर वेळ बाहेर जावून आली , जेवली आणि झोपायला गेली . आकाश आलेले कळले तिला , पण ती उठली नाही 
पण तिला काही अस्पष्ट आवाज ऐकू येत होते , आई आणि आकाश चे . खर तर आकाश इतक्या आवाजात काहीच बोलत नाही , आज काय झालाय . काही नाही आई नि परत लग्नाची तारीख वगैरे बोलणी सुरु केली असतील म्हणून वैतागल असेल , सकाळी करते मी मूड ठीक एकदम त्याचा , आणि इरा झोपली 
"आई , अनु सांगत होती ते खरय ?"- आकाश 
"कशाबद्दल ?"
"मी हॉस्पिटल मधल्या बदल बद्दल बोलतोय आणि तू तिला इतके involve  का करून घेतीयेस आता पासून "
"अरे आकाश , असे काय . ती आपलीच तर आहे आता आणि तू पण नाहीयेस.  मला आणि बाबांना व्याप नाही झेपत आता आणि आम्हाला बाकीचे कॅम्पस घायला जावे लागते , ते आवडते आम्हाला "
"मान्य , ती आपली आहे , पण होणार आहे आणि विनिता मावशी आहे न , आणि आता एक दोन वर्षात इरा पण येयीलच  कि हाताखाली . आणि तुझे काय असे वय झालाय . मला काही पटत नाहीये हे "
"हे बघ , आकाश,  विनिता आहेच आणि मान्य कि ती पण घरच्या सारखीच आहे , आणि इरा चे काय रे , ती लहान आहे अजून आणि पुढे PG करणारे कि आणि काही , ते ठरले नाहीये , आणि  लग्न होवून दुसरी कडे  गेली म्हणजे किंवा कुठे तरी जाईल पहाडात , practice करायला , तिच्या रक्तातच आहे ते "
"आई , ठीक आहे , पण ए दोन वर्ष काय ते कळेलच न आणि लग्न झाले तर ती हॉस्पिटल मध्ये येवूच शकते कि इरा  , शेवटी हॉस्पिटल आजोबांचे आहे , ते चालवायला आपले कुणी तरी हवाच कि . मला अजून हि असे वाटतय कि अनु नवीन आहे , आणि तिचा स्वभाव चांगला आहे पण थोडा उतावळा आहे आणि महत्वाकांकशी . तिच्या साठी हे सगळे नवीन आणि अप्रूप आहे , अजून हि विचार कर . आणि एक लक्षात ठेव माझे आणि इराचे एकाच रक्त आहे , आम्ही पहाडात जावू नाही तर आणि कुठे , आणि ती जाईल  तर मी पण जावू शकतो., बाबा किंवा आजी समोर प्लीज हे असे  बोलू नको आणि . असो मला काय वाटले ते सांगितले  "
"आकाश , तू पराचा कावळा करतोयेस . असे काही नाहीये . आणि तुझ्या बोलण्याचा मी विचार करेन आणि इराचे म्हणशील तर मला इतकाच म्हण्याचे आहे कि ती लहान आहे तशी अजून . मुले किती पण मोठी झाली तरी आई साठी लहानच असतात . आणि मुलींची एक वेगळीच काळजी असते आई वडिलांना . तुला नाही कळणार , कारण तू इराचा भाऊ आहेस , आई वडील नाहीस . जावू दे , तू जा आणि झोप आता . आणि तुझे म्हणणे विचारात घेईन मी "
आकाश झोपायला गेला खरा , पण त्याला हे सगळे पटत न्हवते हे खरे , त्याला नेहमीच वर्तमानात जगायला आवडायचे , भूतकाळात  तो शिरायचा नाही आणि भविष्य ची काळजी करत जगू नये असे त्याला वाटायचे . अनु त्याला चांगली वाटत होती , पण काही काही गोष्टी मात्र त्याला पटत न्हवत्या . असे वाटत होते कि एखादे गाणे छान आहे , म्हणजे सूर ताल , लय अगदी सगळे छान आहे , पण काही तरी हरवले त्यात कदाचित भावच उमटत नाही  आहेत त्या गाण्यात , अनुच आणि त्याचे नात हि असाच होता का कदाचित 

झरझर सगळा भूतकाळ त्याच्या समोरून सरकत गेला आणि तो वर्तमानात आला . अनु शी लग्न मोडल्याचा दु:ख तर अजिबात न्हवते  त्याला आणि पश्चाताप तर अजिबातच नाही . इरासाठी , त्याच्या आयुष्यातला एक निखळ आणि निर्मल प्रेम समोर आणि आनंद समोर हे काहीच न्हवते . आजी असती तर तिला सारे कळले असते , आपल्या मनातले.   पण असू दे इराला तिचे प्रेम मिळतंय आणि निमिष इराला नक्की जपेल , आपण निम्म्या जबाबदारीतून मुक्त झालो आता , असे वाटले त्याला आणि स्वताशीच हसला तो आणि नकळत त्याने त्याचे आवडते गाणे लावले 
"  मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कही
 और पलको पे उजाले से झुके रहते हैं 
होंठ कुछ कहते नहीं, कापते होठों पे मगर
 कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं-"
क्रमश: 
- Sheetal Joshi 

Friday, 12 June 2015

एक गोष्ट त्यांची पण - भाग तीन


एक गोष्ट त्यांची पण - भाग तीन 

थोडेसे पूर्वीचे , संगती लागावी म्हणून :

आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण"  . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती,  दिसली तीच हि बाग   , आणि त्याला एकदम आठवले  , असे वाटले कि इरा  आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. "  आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा …… 
" आकाश , अरे काय झाले ……… इरा कुठे दिसली का तुला ? आणि इतका का घाबरून ओरडत आहेस ? काय झाले काय ? , पाणी पी थोडे , तुझ्या शेजारी आहे बघ बाटली "
"सॉरी , अरे काही नाही असच, असे वाटली कि इरा पडतीये खाली जोरात आणि मी पोचे पर्यंत …।"-निमिष 
 " अरे , तू इतका आणि तो पण असा विचार नको करू, आणि मध्ये कुठे इरा पडतीये वगैरे , लहान आहे का ती आत्ता , आणि हो माझ्या प्रेमात पडलीये आणि आता संसारात पडतीये म्हणून ओरडत असशील तर इराआआ---- ऐवजी आकाश सांभाळ असे तरी ओरड . पण खर संग न काय झाले कारण माझ्या पीजे वर पण हसत नाहीयेस मनापसून , बैचैन  का आहेस ?"
 "काही नाही दुल्हे बाबू , आपण  थांबलो खायला कि सांगतो "
"अरे पोचलोच कि आपण , मस्त पैकी मिसळ चापू आधी , मग ठरवू next काय ते "
आकाश आणि निमिष गाडीतून उतरले , खर तर निमिष  ला जाणवले कि काही तरी बिनसले पण नक्की काय ते  कळत नवते . अशी काय आहेत हि बहिण भावंडे , इरा पडतीये ह्या कल्पनेने पण हा केवढा बैचेन आहे , नाही तर आमचे भाऊ  खरेदी ला या म्हंटले तर आता वेळ नाही , मग वेळ नाही , तरी बरी नुसते खरेदीला मदत करायला यायचं , पैसे नाही खर्च कारयाचे आहेत . आकाश  ला विचारायला पाहिजे काय झाले ते , इतक्या वर्षांनी आलाय , थोडे मन मोकळे झाले तर त्यालाच बरे वाटेल 
"आकाश  , आता संग कि मगाशी काय झाले ते "
"काही विशेष नाही रे , ती दिसली "
"कोण ??????, म्हणजे तुझ्या इतक्या मैत्रिणी होत्या त्यातली कोण ?"
"काय रे तू पण , ती म्हणजे ती बाग . आम्ही जुन्या घरी राहायचो तेव्हा नाही का आपण सगळे जायचो ती …"
"आपण सगळे , नक्की न … खर तर आकाश  , तू बागेत जायचास तुझ्या लाडक्या बहिणी साठी आणि म्हणून आम्हाला खेळायला तिथे बोलावायाचास आणि  यायलाच लागयाचे, कारण  क्रिकेट चे किट , badminton ची राकेट हे सगळे तुझ्या कडेच होते न , बर ते जावू दे . बाग बघून ओरडलास "
"तुला आठवते का रे निमिष  , एकदा इरा झोपल्या वरून पडली होती त्या बागेत "
"हो , म्हणजे अंधुकसे आठवतोय , आपण जाम  घाबरलो होते , आणि तिला तुमच्या दवाखान्यात नेले होते . काका  ओरडले होते आपल्याला दुसर्या दिवशी । लक्ष कुठे असते तुमचे आणि लक्ष देत येत नसेल तर तिला अजिबात नेऊ नका वगिरे वगिरे "
"हो , अगदी बरोबर , अंधुक काय , स्पष्ट आठवतंय कि तुला "
"पण आकाश इतक्या वर्षांनी का आठवले तुला , आणि आठवले तरी इतके घाबरायला काय झाले आता ?, आणि तेव्हा पण काही फार लागले नवते "
'हो , फक्त चार टाकेच तर पडलेत , आणि सगळी लहान मुले अशी एकदा तरी पडतातच , त्यात काय इतके , इट्स ओके , अस आईनी ऐकवले रे मला ,. पण माझ्या साठी ते चा------र  टाके होते. तुला आठवतंय का कि आपण दवखान्यात  घेवून गेलो तील तेव्हा ती किती रडत होती आणि माझा शर्ट रक्ताने भिजला होता . अजून हि आठवते मला . आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो , लहान पाणीच्या काही काही आठवणी आपल्या पिच्छा सोडत नाही त्यातलीच हि एक , मला अह्जूनही असाच स्वप्न पडते कि इरा पडतीय आणि तिला वाचवायला कुणीच नाहीये आणि मी तिच्या पर्यंत पोचू शकत नाहीये   "
"अरे  आकाश , असे काय करतोयेस , आता किती वर्षे झाली त्या घटनेला आणि मला अजून हि कळात नाहीये कि त्याचा इतका का परिणाम झालाय तुझ्या वर . म्हणजे आपल्या प्रत्येकच्या आयुष्यात असे असतच कि कधी तरी किंवा आपली भावंडे पडलीये , त्यांना लागलाय किंवा खूप आजारी पडलीत , अगदी तू सुधा  पडला  होतास कि , हात मोडला होता तुझा , ते विसरलास , त्या मानाने इराला काहीच लागले नव्हते रे "
"हो , खरय . ए तुला आठवतंय का रे निमिष  , माझा हात मोडला होता तेव्हा मी इयत्ता ९ मध्ये  असेन आणि इरा असेल चौथी मध्ये , पण रोज माझे दप्तर कार पर्यंत स्वत : घायची , पेलायची नाही तरी , रोज डबा खायला पण आपल्या सोबत यायची , आणि रोज हट्ट करायची कि दादू मीच तुला भरवणार , खर सांगू तुम्ही सगळे खूप चेष्टा करायचा माझी , पण मला कधीच फिकीर नाही वाटली  त्याची ., का सांगू कारण आजी नंतर तसे मला कुणीच प्रेमाने भरवले नाही रे , म्हणजे आई कधी तरी असायची पण ती तरी काय करणार , तुला हॉस्पिटल , कॅम्पस या सगळ्यातून वेळच कमी मिळायचा . इरा माझी बहिण नाही , तर माझे कुटुंब आहे रे "
"ते सगळे खरय मित्रा , मला माहितीये आणि जाणवलय सुद्धा आणि म्हणूच इतक्या गोड मुलीशी मला आयुष्यभर एकत्र जगायचं , फार जीव लावते यार हि . पण इराच्या पडण्याचा अजुनही इतका प्रभाव का आहे तुझ्यावर ते सांग . विषय बदलू नको . म्हणजे त्या हि पेक्षा किती तरी अश्या गोष्टी आयुष्यात कळल्या आहेत तुला , ज्याने तू असा अस्वस्थ झालास तर मी समजू शकतो "
"विचारतोच आहेस तू निमिष  म्हणून सांगतो , कदाचित तुझा पण दृष्ट्कोन कळेल मला. आपण दवाखान्यात गेलो इराला घेवून तेव्हा , मी तर घाबरलो होतोच , पण इरा पण घाबरली होती आणि नेमके त्या दिवशी च आई , बाबा दोघे पण दवाखान्यात  नव्हते , कॅम्प साठी जवळ  असणाऱ्या एका खेड्यात गेले होते , आणि आजी  पण बाहेर गावी गेली होती . टाके सुद्धा विनीता मावशीने घातले . मी  आई ला फोन केला  होता रे निरोप द्यायला , तेव्हा काय मोबाईल  नवते , पण तिला  निरोप मिळाला होता . ती विनीता मावशी सोबत बोलली आणि मग निरोप दिला कि संध्याकाळ पर्यंत पोचतेच आहे म्हणून . आमचच  हॉस्पीटल  त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतले रे . घरात काय आमचे नोकर चाकर असायचेच सोबतीला , म्हणजे घराच्या सारखेच होते , पण …मला वाटत होते कि हातातली सगळी कामे टाकून आई नि लगेच  यावे आणि इराला कुशीत घेवून विचारावे कि कशी आहेस बाळा , घाबरू नकोश वगैरे . आई आली म्हणजे तशी लवकर आली . इराला जवळ पण घेतले आणि मला ओरडली पण नाही , पण इतकच म्हणाली, तुला इराची जबाबदारी घायचो असेल तर घे नाही तर आम्ही आहोतच कि काही तरी व्यवस्था करू ,  बाकी काही नाही पोरीला काही झाले तर ….  तिच्या स्वरात काळजी होते रे , पण काही तरी नव्हते . एखाया दिवशी बघ भाजीत सगळे घातले तरी चव येत नाही आणि काय राहालीये ते पण काळात नाही , असे काही तरी वाटले मला . मग काय बाबा आले आणि शाळा घेतली आमच्या दोघांची , इराची पण . इरा , आणि मी आजी च्या खोलीत झोपनर होतो त्या दवशी कारण ती खालच्या मजल्यावर होती . मला उगाच वाटले कि आई पण इरा सोबत झोपेल , पण तिला काही तरी काम होते म्हणे , कसले तरी रिसर्च चे . मला काय वाटले कुणास ठाऊक , पण मी आई ला म्हणालो , कि थांब न आजच्या रात्री इथेच , कदाचित इरा उठली तर , तिला तूच हवी असशील  आणि तुला तरी झोप लागणार आहे का ? काय आहे ते काम इथेच कर , दिवा सुरु राहिला तरी चालेल आम्हाला . तसे आई नि काही आढे  वेढे घेतले नाहीत , ती थाबली , रात्री बराच वेळ जागी होती , मध्ये मध्ये उठून इरा कडे पाहत पण होती . सगळे होते पण तरी हि , माहित नाही , असे वाटले कि  काही तरी नाहीये या सगळ्यात , काळजी आहे , जबाबदारी आहे , प्रेम ?, प्रेम सुद्धा आहे पण आई ची माया थोडी आटली  आहे का ? म्हणजे आई वाईट नाहीये , पण आज आता ती इराची आई नाही तर पालक वाटतीये , कदाचित दिवसभर दमली असेल , आणि इतके काही जास्त लागले पण नाहीये , त्यात आई डॉक्टर म्हणजे तिला खरच किती लागलाय हे कळते ना म्हणून पण कदाचित ती …, "
"अरे , हो आकाश  पण तरी हे सगळे तुझे विचारच ना  आणि तुला नक्की काय खटकले , आई लवकर आली नाही हे का ?"
"नाही ,  ती कामात होती आणि इरा वर उपचार झाले होते आणि आजच्या इतकी दळण वळणाची साधने पण नवती तेव्हा , त्यामुळे ती या पेक्षा लवकर येवूच शकली नसती आणि ती विनिता मावशी सोबत दोन वेळा बोलली पण होती . मला काय खटकल माहितीये "पोरीला काही झाले तर ", मधला काळजीचा स्वर , काही तरी वेगळा होता , संकटात पडल्या सारखा आणि तिचे आपणहून रात्री न थांबणे . मी म्हंटल्यावर  लगेच थांबली ती , म्हणजे तिने तसे इराला झोपवले होते , पण तिने आपणहून थांबायला हवे होते . तेव्हा पासून मला पक्के डोक्यात बसले कि  आता   इरा माझी जबाबदारी आहे , तिच्या साठी कुणी थांबो अथवा न थांबो , मी आहे , माझ्या इरा साठी . नेहमीच त्या घटनेने मला ह्याची जाणीव दिली म्हण किंवा त्या एका प्रसंगात माझे आणि इराचे नाते बदलले असे म्हण , म्हणूच कदाचित आता इतके सगळी स्पष्टीकरणे  मिळून सुद्धा  हि ती घटना माझ्या मनात पक्की बसली आहे . कधी कधी हातातून काही निसटते आहे असे वाटले कि मला असाच स्वप्न पडते . आता कारण म्हणजे ती बाग इतकाच . जावू दे आपण फारच गंभीर विषयाकडे  वळलो, पण तू विचारलास मला बरे वाटले. कधी कधी प्रश्नाची उत्तरे मिळाली कि नवीनच प्रश्न समोर येतात , आणि उत्तरे बरोबर असून हि पटत नाहीत .    "
" मित्रा , काळजी नको करू , मी तुझ्या इराला कधीच दुखावणार नाही , जरा  भावूक झालोय म्हणून सांगतो , विश्वास ठेव "
"अरे ए आकाश , भावूक हो तू , पण एक लक्षात ठेव , दहेज मे  हम आ राहे है . मी काळजी गेईन असे म्हणून मला कटवु नको, कट  करून "
"नाही रे , तुला न कटवता , मिसळीचा कट  मागवतो  "
"अरे , दुपारी  कुठे जायचं रे आकाश  "
"मेनू ठरवायला, अरे तोच नेहमीचा हॉल ,तुझ्यावेळी ठरवले होते कि तेच रे …I am sorry , चुकून बोललो कि तुझ्या वेळी असे   "
"असू दे रे , बित गायी बात गयी ,आणि असे काही नाही , इरानि   सांगितलं मला कि लग्न केले आहे तिने …"
"इरा म्हणजे न , अवघड आहे , मी म्हंटले होते तिला कि आकाश ला काही बोलू नकोस . तू आधीच तिकडे एकटा , त्यात उगाच पुन्हा जुन्या आठवणी त्यापाणु कटू आठवणीना उजाळा कशाला द्या "
"नाही रे , इतके काही नाही  वाटत मला , आणि तसे पण जो काही निर्णय आम्ही  दोघांनी घेतले त्याचे वैषम्य नाही आहे मला . जे झाले ते योग्यच होते . माझे आणि तिचे आयुष्य एकत्र कधीच सुखाचे झाले नसते. न माझ्या , न तिच्या आणि ना …  कुनाच्याच . आई आणि बाबांना खूप मनस्ताप झाला, त्यांना मला समजून घेणे तेव्हा पण जमले नाही आणि आता पण त्यांच्या  आवाक्या बाहेरचे आहे सगळे .  आणि इराची तेव्हा पासून कसरत सुरु झाली , आई बाबा आणि मी अशी नात्यांची तारांबळ .  "
"अरे पण , तिला पण नकोच होते क हे लग्न , नाही तर तिने परत कशाला लग्न केले असते , ते पण प्रेम बिमात पडून . आणि मग आता काका काकुना काय प्रोब्लेम आहे , हे तर माहितीये न कि तू काय फक्त एक मार्गी लग्न मोडायचा निर्णय घेतला नव्हतास "
"निमिष , फक्त ते आणि तितकाच कारण असते तर मग कशाला , आमच्या या नात्याला खूप कंगोरे आहेत आणि म्हणूच गुंता पण मोठा आहे . लग्नासाठी नकार किंवा त्याची करणे हे आणि इतकाच आमच्यातल्या तणावाचा कारण आहे असे वाटते तुला . खूप वर्षापासून हा तणाव होता आमच्यात ,  हे एक निम्मित झाले फक्त कि तो तुम्हा सगळ्या समोर आला . असे बराच काही आहे अजून . जावू दे , परत गंभीर विषय नको आणि मला पण एन्जॉय  करायचे आहे तुमचे लग्न . मी त्या साठी आलोय न इथे आणि तसाही तू फार वेळ गंभीर संभाषण करू नाही शकणार . आता आपण तुझ्या भाषेत 'सुंदर पैकी चहा घावू आणि सुंदर पैकी तुझी काम उरकू "
"अरे म्हणजे आय अति महत्वाची कामे आहेत , माझे shopping राहिलंय अजून , साला कुणाला वेळच नाही यार . बरे झाले तू आलास , आता तुलाच राबवतो "
"रोजगार हमी योजनेवर आल्यासारखे वाटतय मला . फ़ोरेन रिटर्न वेठ बीगार . पण निमिष , कमीत कमी तुझ्या आई बाबा न तर घेवू यात न बरोबर जाताजाता "
"ते काही तरी वेगळ्या गडबडीत असतील , हा होम ते हवन . यांना पत्रिका द्यायची , आमंत्रणे बाकी आहेत वगैरे "
"अरे पण विचारू तर खरे , मी विचारले तर नक्की येतील बघ . आणि काकुनी काय लाडू बीडू  बनवालते  त्याची चव पण चाखता येयील "
"मग चल, तसाही आई नि काळ पासून १०० वेळा तरी मला सांगितले आहे आकाश ला काय हवे नको ते बघ आणि त्याच्या सोबत घरी एखादी चक्कर टाक  म्हणून "
"चल मग , म्हणजे वेळेत काम करु नाही तर ती आमची बया  ४ म्हणजे ४ ला हजर होईल आणि माझे डोके खाईल " 
" ए थांब निमिष  , इराला फोन करतो , जरा गम्मत , कश्यावर ताव मारतिये ते तर कळेल…लागला फोन, ए काय ग काय  खातीयेस तरी काय ? इकडे आम्हाला सोडून , माझा नाही भावाचा तरी  विचार करायचास   "
"अरे ए , निमिष आधी फोने वर हेलो  तरी म्हणत जा , लगेच काय चौकश्या , फोन कुणी पण उचलू शकतो . आणि फालतू गप्पा नकॊ, काही काम असेल तर सांग , मी आता विनीत मावशी कडे खाण्यात बीझी आहे , कळले . आणि काम नसेल तर ठेव फोन , नाही तर मीच ठेवते ?"
"काय ग इरा , निमिष  चा फोन वाटते , अग मी त्याला पण घेवून ये म्हणाले होते "- विनिता मावशी 
"नको ग, त्याला कशाला , नंतर आहेच कि मग लग्न नंतर , सारखे  त्याचेच कौतुक करता मग तुम्ही लोक ,  दहीवडे मस्त झालेत एकदम "
"आकशाला पण खूप आवडतात न ग , खर तर म्हणून केले , उगचाच वाटले कि तो पण येयील आणि म्हणून चौघांच्या आवडीचे पदार्थ केले न मी . तो एकटाच चुकला बघ . येणार आहे का नाही तो ? आता तुझे लग्न म्हणजे येणारच म्हणा , पण आज चुकला बघ "- विनीता 
"मावशी , तू घरचीच आहेस , म्हणून खोटे नाही बोलत , तो कालच आला आहे "
"इरा……"- इराची आई 
"ए बोलू दे ग तिला , बोल ग इरा तू . कधी आलाय आकाश आणि त्याला का नाही आणलस मग , तो काय परका आहे का ? आणि त्याला माझ्या कडे आणायला काय प्रोब्लेम आहे . तुला माहितीये न कि मला तुम्ही दोघे मुलासारखेच आहेत आणि तू नुसते सांगितलास असतास न तर माझ्या आमंत्रणाची वाट पण पहिली नसती त्याने आणि आई ला घाबरता का तुम्ही अजून पण . ती काय म्हणाली असती तर मी सांगितले असते का ते . तुम्ही चौघे आहात तिघे नाहीत कुटुंब म्हणून किती वेळा सांगितलाय मी तिला . जावू दे बेटा , त्याला संग येवून जायला , जमेल तसे "
"अग मावशी , तो आला असता का ग , पण काळ रात्री उशिरा आलो न , आणि आज आकाश आणि त्यांचे मित्र भेटणार होते कोण कोण म्हणून मीच नाही आणले त्याला . आई बाबाचे काही नाही ग तसे "
"असो , या निम्मितने का  होईना , तो घरी आलाय , बरे वाटले . बर मी त्याच्या साठी न देते सगळे थोडे थोडे डब्यातून , तू घेवून जा हा "
इरा विचारात होती कि मावशीला जर आकाश यावासा वाटला तर आई बाबा का नाकी म्हणले . मावशी काही आमची नातेवाईक नाही पण खूप जवळची आहे , माल आणि आकशा ला तिने लहान पण पासुन पाहिलये , मग ती जर आकाश ला माफ करू शकते तर आई बाबा का नाही ?  कधी तरी मला जमेल का मला हे सगळे परत पहिल्या सारखे करायला . लहानपणी एकदा चित्र काढायला घेतले आणि मधेच जर खोडले  न तर असे वाटायचे कधी कधी कि पहिलाच चांगले आले होते , आता परत तसच काही जमायाचे नाही , तेव्हा आजी म्हणायची , कि बाळा  चिडचिड करू नको , थोडा वेळ काहीच करू नकोस आणि मग परत नवी सुरवात कर . तसा अजून थोडा वेळ देवून नवीन सुरवात करावी लागणर का मला ?, आकाश- इरा आणि आई -बाबा  अश्या समांतर रेषा झालाय आहेत जणू , एकाच प्रतलात कधीच न मिळणाऱ्या … 
"इरा , काय करायचं , तू खरच आकाश ला डबा देवून येतेस का ? आम्ही जातो घरी "- आई 
"नको , उगाच हेलपाटा मला , तसे हि आपण त्याला सांगितले नव्हते आणि आत उगाच  कशाला ?"
"पण मावशीनी इतका प्रेमाने दिलाय आणि त्याला आवडतात न ग …………" - आई 
"मग तूच नेउन दे न , इतके प्रेम उफाळून  आलाय तर "
" इरा , बेटा , प्लीज , तू तरी । जावू दे , मी संगीतीये न तू दाबा देवून ये आणि तसा हि आम्ही तुला पण ऐन वेळी संगितले न हे केळवणं चे मग , त्याला पण तसाच सांग  . "
"ठीक आहे , निघा तुम्ही , मी दादू कडे जाऊन येते "
इरा  पोचली , हे दोघे अजून आलेले दिसत नाहीयेत , फोन करून यायला हवे होते . जावू दे किल्ली तर आहे , डबा  ठेवून , message करते . इराने  दार उघडले, फ्रीज उगडून त्यात डबा ठेवला आणि ती आकाशाच्या खोलीत गेली . खोली आवरलेली होती , काही वस्तू मात्र काढून ठेवल्या होत्या . आकाशानी सगळ्यासाठी गिफ्ट  आणल्या होत्या . 
हा असा कसा आहे इतका कुल , लहान पण पासून असाच आहे , इकडे आग लागली  तरी  हा असाच शांत . बर्फ पण कमी थंड असेल . मी याच्या  जागी असते तर , आई बाबांकडे येवून सरळ कचकचा भांडले असते . 
इतक्यात तिला दार उघडल्याचा आवाज आला आणि गम्मत करावी म्हणून ती आवाज न करता तशीच थांबली 
"निमिष प्लीज , हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला  यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . न्हाणून आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये  मला आकाश ?",
क्रमश : 

Sheetal Joshi

Sunday, 7 June 2015

एक गोष्ट त्यांची पण !!!, भाग -२


एक गोष्ट त्यांची पण !!!,  भाग -२

आपल्याला अशी अधून मधून स्वप्न पडतात , आणि कदाचित आपल्याला आवडतात सुद्धा , थोडेसे झोपेतच त्याच्या मनात हे विचार येत होते . आकाश स्वप्नाळू  कधीच नव्हता , पण हि अशी स्वप्ने त्याला आज काळ आवडायची . आपण एकटे नाही आणि आपली काळजी करणारे आपल्या जीव भावाची व्यक्ती आहे  याची जाणीवच होती ती 

पण हे स्वप्न आहे कि सत्य , पण डोळ्यांवर ची झोप अधिक प्रभावी ठरली आणि जागा झालेला झोपी गेला . इरा खरच आली होती  का ? कि परत केवळ स्वप्न आणि  भास । 
 अंदाजे २ तास तरी झाले असतील , आकाशाला जाग  आली , म्हणजे अजूनही नुसताच पडून राहावे असे त्याला वाटत होते , इरा नि येवून उठवावे आणि आपले स्वप्न खरे असावे अस हि त्याला वाटत होते , पण …. 
तो उठला , आजूबाजूला नजर फिरवली आणि एकदम प्रसन्न वाटले त्याला , घरी आल्यासारखे . काल गडबडीत त्यानी आपली खोली निवांत पहिलीच  नवती . आता पहिली आणि स्वताशीच हसला तो . 
आपल्या सगळ्या छोट्या छोट्या आवडी निवडी किती जपल्या आहेत या पोरीने . खोलीची रंगसंगती , चादरीच रंग इथपासून  ते अगदी …अरेच्चा , निशिगंध आणि गुलाबाची फुले सुद्धा आहेत कि इथे  फुलदाणीत . खर तर "फ्लॉवर  पॉट म्हण्याचे होते मला , पण इरा आठवली , इथे असती तर म्हणाली असती काय रे मराठी वापरायची लाज वाटते कि काय आता तुला :). 
 आकाश चे अलीकडे असच होत होते , सगळे संवाद स्वताशीच , विचारांच्या गर्दीत तो एकटाच :)
आकाश आवरून बाहेर आला 
"शुभ प्रभात निमिष "
"काय रे आकाश , सकाळी सकाळी  इरा चढली का तुला , शुभ प्रभात वगैरे "
 "ए , पण ती आली होती का रे सकाळी "
"नाही "
"नक्की ?"
"हो आकाश , पण तू असे का विचारतो आहेस"
"इरा नक्की आली होती , या वेळी भास नाही , खर होते ते , प्लीज , सांग ना ""

"पण तुला असे का वाटतय , कि इरा आली होती "
"हे बघ , मला निशिगंध आणि गुलाब किती आवडतो ते तिला माहितीये आणि काळ रात्री ती फुले खोलीत नव्हती आणि आता आहेत . "
"शाब्बास , व्योमकेश बक्षी , अजून तुम्ही हुशारी टिकवून आहात तर "
"म्हणजे इरा आली होती न , मग कुठाय आणि मला न उठवता का गेली ?"
"अरे हो हो , गेलीये पण येणारे , अर्ध्या तासात येते म्हणाली . आणि ब्रेकफास्ट , म्हणजे न्याहारी एकत्र करू म्हणाली . बघ ना , तुमच्या दादा- ताई च्या प्रेमात मला उपाशी ठेवलाय , जाऊ दे चहा घेणार न तू , मी करतो एकदम सुंदर पैकी चहा आणि मग देतो तुला सुंदर पैकी कपातून "
"अरे चहा तर पाहिजेच , आणि काय रे अजून हे सुंदर पैकीच वेड  आहेच  वाटते , आणि ए कम ऑन तू आणि सकाळ पासून उपाशी , थापा नको मारू आता , लग्न दहा दिवसावर आहे , सुधारा आता "
"अरे म्हणजे काय खास नाही पण खाल्लाय जर आपले उगाच एवढस,खाली जावून , इडली सांबर, वडा पाव , एक पोहे आणि दोन चहा आणि …आणि  काही नाही , बस तू मी आलोच आपला चहा घेवून"
  "वाह , निमिष , तू अगदी गृह कर्तव्य दक्ष झाला आहेस हा , चहा एकदम फक्कड , अगदी मला हवा तसा "
"काय करणार बाबा, तुझ्या बहिणीश संसार करायचा न , तुला गम्मत सांगू , ती खूप आनंदात आहे रे तू आलास म्हणून . मला दहा वेळा बजावून गेली कि तुला कसा चहा आवडतो ते , पार पकलो मी … पण मला छान वाटत होते कि या सगळ्या घडामोडी नंतर हि तुम्ही दोघे मात्र अजून हि तितकेच जवळ आहात , कदाचित जर जास्तच . मजा  सांगू तू येणार म्हणून तिने आलं  , चहा मसाला  आणि चहाची  गवती पात सुद्धा आणून ठेवलीये घरात . मला म्हणाली त्याला चहा करून दे बाकी काय हवे नको बघ  , तिकडे सगळे स्वताच करतो . आणि तिने पाण्याचा माठ भरून  ठेवलाय  काल , आणि त्यात वाळा आणि मोगऱ्याची फुले सुधा ताकालीयेत , तुला आवडतात म्हणून . मला तर वाटते , त्या बायका नवरा साठी कसे हरतालिका , वाट सावित्री वगैरे करतात न तसे अशी बहिण  मिळायला तू काही तरी व्रत केले असशील . "
"हो खर आहे हे . फार जीव आहे रे तिचा माझ्या आणि माझा सुद्धा तिच्यावर . आता तुला सोपवातोय तिला म्हणजे काळजीच नाही .  खरच , मला कळतंय रे , मी आलोय म्हणून ती खुश तर आहेच , पण मला इथे, आमच्या घरात  नसून सुद्धा , घरी आल्याचे सुख मिळावे म्हणून झटतीय ती . मला कळतंय कि मला इथे राहा असे सांगण्यात तिला खूप मनस्ताप होतोय , पण मी बोलेन तिच्या शी . I am comfortable here and she should not worry about t. She should enjoy these days and my stay in India. anyways whats pla for today "
"अरे राहा रे माझ्या सोबत मजेत , आपण पण किती वर्षात असे निवांत नाही भेटलोय , आणि माझ्या इथे तरी कोण आहे रे , आई - बाबा कधी येतील काय माहित , आज- उद्या असे त्यांचे सुरु आहे . जवळच आहे येतो वगैरे वगिरे आणि भावंडे काय आहेत पण आणि नाहीत पण .  मी पण जाम खुशीत आहे रे , आणि खरे सांगू दु:ख एकट्यानं जगू शकतो रे , पण आनंद वाटून घेणारे कुणी नसेल न तर बाकी काही उरत नाही मग, आनंद सुद्धा .  जावू दे . साला बघ तू आलास न बृहस्पती कि हे असे होते तत्वज्ञान वगैरे वगैरे . पण हे बृहस्पती  , हे ऋषिवर आपण स्नान करून घ्यावे . तो पर्यंत कुमारी इरावती आपली न्याहारी घेवून प्रवेश करेलच . तूर्तास आपण स्नानगृहा कडे प्रस्थान करावे आणि मी आपल्या बल्लावला दुपारच्या  भोजनाच्या सूचना देवून येतो"
आकाश  हसत हसतच आता गेला, निमिष काही तरी बारीक सारीक कामात होता , तेवढ्यात फोन ची रिंग वाजली , 
"निमिष, इरा बोलतीय "
"कळले ग, खास रिंगटोन  ठेवलाय तुझ्या साठी , रडक्या बाळाचा , हि हि "
"ए , नेहमी नेहमी काय रे तेच तेच विनोद , इकडे  राडा झालाय आणि मी जाम  कातावालीये"
" अग हो, हो जर थंड हो , काय झाले ते सांग "
" अरे यार , ह्यांनी केळवणं ची आमंत्रण घेवून ठेवली आहेत , तरी मी सांगितले होते कि जे काय असेल ते आकाश यायच्या आता संपवा . आधी त्याला तुझ्या कडे उतरवलाय , त्यात आम्ही त्याला सोडून हे असे  जायचे , केळवण खात फिरायचे , कसा तरीच वाटतय रे . तो पण  आमचा आहे कि . त्याला इकडे बोलावून मी काय केलाय चांगले कि वाईट , म्हणजे त्याला आनंद वाटतोय कि त्रास होतंय हे च काळात नाहीये रे "
"इरा , शांत हो आणि तू जा , मी  आकाश ला घेवून बाहेर जातो , ब्रेकफास्ट करतो , एक काम करीन आमच्या एक दोन दोस्ताना पण बोलावतो म्हणजे बेस्ट . आणि त्याला सांगेन मी कि तुला आता यायला जमत नाहीये "
"बरे , तू म्हणतोयेस तर तसाच करु. मी दुपारी जेवण झाले कि येते , आपण चार वाजता बाहेर पडू . चल ठेवते आता "
"हो, काळजी घे , आणि शांत पणे  घे "
इराला , आता से वाटत  होते कि आकाश ला इकडे येवून खरच आनंदी आहे न 
"इरा , आटप लवकर "
"हो , आलेच आई, पाच मिनिट "
इराचे घर पाहुण्यांनी भरले होते ,  घर माणसांनी , आनंदानी आणि वेगवेगळ्या सुगंधानी भरलेले , फुलांच्या , अत्तरांच्या , तोरणाच्या , होमाच्या , आणि वेगवेगळ्या  गोड तिखट तळप च्या वासानी  . फक्त एक गंध तिथे न्हवता , राखीचा , भाऊ बिजेच्या औक्षणाचा . पण इरानि आई बाबांना  सांगितले कि होते कि आकाश येयील आणि काही जबाबदाऱ्या  तोच पार पाडेल . खर तर घरच्यांनी पण तो आला तर हवाच होता , पण पाच वर्षात भेट नाही म्हणून कुणालाच अवघड वाटायला नको म्हणून त्याने सध्या तरी निमिष कडे राहावे असे आई ला वाटत होते . तिने इराला काल  पासून शंभर वेळा तरी , कळात नकळत त्याच्या बद्द्ल विचारले होते . इरा;ला पण ते जाणवले , पण उघड पणे   आई बाबा दोघे पण बोलणार नाहीत हे हि तुला ठावूक होते 
"इरा, अग  काय कुठे हरवली आहेस , पोचलो कि आपण . "
"काही नाही बाबा असच . आकाश आला आहे काल "
"हो माहितीये , आम्हाला . पण ग आता त्याला बोलवणे खरच शक्य नाहीये बेटा"
"शक्य आहे , पण तुम्हालाच नकोय . जावू दे . ठरल्या प्रमाणे मी संध्याकाळी त्याच्या सोबत खरेदी ला आणि मेनू ठरवायला जाणारे आहे . ती जबाब दारी त्याला द्यायची असे ठरलाय न आपले . तुम्ही येतंय का . बघ जमले तर . कमीत कमी मेनू ठरवायला तरी या "
"बघू , आता तर आता चल , आणि जास्त विचार नको करू , फक्त आनंदी राहा "
"आकाश शिवाय,  आनंदी  , हं  "- इरा 
आता नेहमी प्रमाणे आई ला मध्ये पडावेच लागले 
"इरा , बास  आता ,   हा विषय इथेच बंद कर . आकाश तुझा भाऊ आहे आणि आमचा कुणीच नाही का ? पण आता हि वेळ नाहीये . आपण घरी गेल्यावर बोलू . रागावू नको ग , पण तुझ्या कडे आता लोक आता तुझ्याकडे  नवरी म्हणून बघतात , मग तू पण छान आनंदी असायला नको का . बर तुझ्या मर्जीने तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न होतंय आणि तुला हवे तसे आकाश  पण आलाच आहे कि आता . "
" ह, कळतंय मला , चल आता  आई "
इराला वाटत होते कि निमिष नि काय सांगितलाय आकाश ला काय माहित . 
इकडे निमिष च्या घरात 
"आकाश  , चल  रे आपण बाहेर खावून येवू माझी एक दोन काम पण करायची आहेत ती पण करू "- निमिष 
" अरे पण  , इरा ?"
"तिला कळवले आहे मी . ती दुपारी ४ वाजता येयील आता ,"
'बर , चल मग "
आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती,  दिसली तीच हि बाग   , आणि त्याला एकदम आठवले  , असे वाटले कि इरा  आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. "  आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा …… 

क्रमश : 
-- 

Wednesday, 3 June 2015

एक गोष्ट त्यांची पण !!!


रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे   निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही .
पण आज मात्र वेळ पळत नव्हता  अन  विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते . पण ....इरा सतत घड्याळाकडे  बघत होती , कोणत्या हि क्षणी तो बाहेर येयील , आपल्याला काय वाटेल त्याला पाहिल्यवर हेच तिला झेपत नाही असे वाट होते
 इराला कंटाळा आला आहे असे वाटे पर्यंतच .....तो आला "इतक्या वर्ष नंतर पण तो अजून तसाच , तेवढ्याच वयाचा कसा काय दिसू शकतो"....... "इरा............", त्याचा त्या उत्साही सादेने तिची विचार शृंखला तुटली.... " अग ये इकडे तिकडे काय बघातीयेस...ओळख आहे ना......, कशी ग तू अशी कायम आपल्याच नादात, तुझ्या पार्टनर ला पण अशीच पकवतेस का ग , आपल्यातच हरवून :) "
आकाश बोलतच होता अन इराला काय बोलायचे , काय कारायाच्रे तेच सुचत नवते....आणि हा मात्र मधली सगळी वर्षे गायब करूनच आला होता जणू काही

इराला त्याचा " पार्टनर " शब्द खटकला , तिच्या या आवडत्या पुस्तकावरून आकाश तिची खूप खेचत असे , आणि तुला दुसर्याच क्षणी त्यातलाच संदर्भ तिला आठवला "पाठीला पाठ लावून आलेली भावंडे "
"अहो बहिणाबाई , बघतच  बसणार कि मला घरी पण नेणार आहेस ?"
"अरे , sorry  एकदम बराच काही आठवले आणि काही सुचलास नाही रे , किती वर्षे झाली रे तुला बघून, चल लगेच निघू यात "

" तुला बरे पाठवले कि आई नि , स्वतः गाडी घेवून, लग्न दहा दिवसावर आलाय आणि , अर्थात तुझ्या हट्टापुढे कुणाचे काय चालणार म्हणा , तशी पण तू आमची लाडोबा आहेस , कोण कोण डेरे दाखल झालाय ग ?, काही पण म्हण तू मस्त वाटती आहेस आता , आय मीन online दिसतेस त्या पेक्षा , मला खरच नाही वाटत आहे कि तू इतकीमोठी झालीयेस , मला अजून पण ती शाळेच्या गणवेश मधली आठवतेस ग ......किती वर्षे गेली न उडून ...अत्तारासारखी"

इरा सफाईने गाडी चालवत होती , मुंबई - पुणे तिचा जणू रोजचा रस्ता होता , तिला असे वाटले कि तिला जी मधली वर्षे  सतत डाचत आहेत , जाणवत आहेत , ती याची गावी नाहीतच जणू मुळे, कसे जमते ह्याला हे , पण तो जे बोलतोय ते अगदी मनापासूनच , त्याला आत एक बाहेर एक जमलाच नाही मुळात ....आणि याच्या या प्रश्नांची  काय उत्तरे देणार , घर तर पाहुण्यांनी भरलाय , पण याच्या साठी कुठे जागा आहे त्यामध्ये, कसे सांगायचे याला कि याची सोय कुठे केलेय ते ... जावू दे आता नकोच काही बोलायला या बद्दल ....
"अग  तू काय मौन व्रत घेतले आहेस कि काय ?"
"अरे नाही , लक्ष जर  traffic  कडे होते, तू सांग कसा आहेस आणि प्रवास  कसा झाला तुझा ? तुला भूक लागली असेल तर थांबू आपण,  नाही तर मागे डब्या मध्ये लाडू आणि sandwitches  आहेत घे न तू "
"लाडू , अरे वा आई नि केलेले दिसतात "
"नाही रे , मीच केलेत , बघ हा ...काही झाले तुला तर तुझ्या जबाबदारी वर खा"
"बाप रे , असू असू दे तेवढी रिस्क घायला काय हरकत आहे तुझ्या बद्दल, तो जो सो called तुझा पार्टनर आहे ना निमिष नावाचा , त्याच्या रिस्क पुढे हे तर काहीच नाही :)
"आकाश , तुला कानपिळी  साठी बोलवले आहे विसरू नको आणि तू झोप थोडा वेळ , पुणे आले कि उठवते तुला " इरा नि मस्त पैकी  आवडती गाणी लावली आणि ..
आकाश थकला  होता , कित्येक मैलांचे आणि वर्षांचे अंतर कापून तो आला होता , दमला होता , झोपून पण गेला
आणि मग इरा , समोर रस्ता , गाणी आणि सोबतीला असंख्य विचार ....हा खरच आला , केवळ आपल्या साठी , म्हंटले तर कसलाच पुढचा मागचा विचार न करता ....आणि एकी कडे फक्त माझाच विचार करून .....
का बोलावले मी याला , मला आत्ताच का गरज वाटली याची . खर तर मी जेव्हा जेव्हा अडखळले , गोंधळले तेव्हा तेव्हा हा होता . पण आता असा काहीच नाहीये , मी निमिष ला स्वत निवडलाय .
त्याला मी आणि आकाश किती वर्षे ओळखतंय , पूर्ण वेळ देवून, आणि विचार करून हे लग्न ठरलाय . तरी मला आकाश येई पर्यंत इतके बैचेन का वाटत होते , आणि आता तो आहे तर उगाचच मन भरून आलाय आणि जर बरे वाटतय ........अरॆऎऎऎए
"इरा , लक्ष कुठाय , सावकाश चालव , कंटाळा आला असेल तर आपण थांबू पाच मिनिट . बाई साहेब लग्न आहे तुमचे विसरू नका आणि जर जमले तरी माझी पण काळजी करा ..."
अरे सॉरी, परत नाही होणार असे , आणि नको थांबायला , पोचत च आलोय आपण , अजून अर्धा तास फार तर , तू झोप  . त्याने परत डोळे मिटले. तरी मन थोडेच झोपणार  ते तर जागेच , किती विचारांचे काहूर माजले होते त्याच्या मनात. खर तर त्याला इतक्यात कुणा समोरच परत यायचे नव्हते , प्रश्न चुकवावे असे म्हणून नाही तर उत्तरे द्यायचा कंटाळा आला होता म्हणून .
"मी  आलो आता सुद्धा  केवळ या पोरी साठी . किती माया आहे  तिची आपल्यावर , आणि किती विश्वास . भावा पेक्षा मैत्रीच नाते म्हणूनच अधिक घट्ट . पण आपल्या येण्यामुळे वातावरण गढूळ तर नाही न होणार . केवळ इराचे लग्न आहे म्हणून  , हे प्रश्न निसटतील . जावू दे मी माझ्या परीने प्रयत्न करीन कि  लग्न घर अगदी आनंदी असेल , जसे असायला हवे तसाच .'
 " बंधूराज , उठा !!! हम अपनी मंझील पोहोच गये " .
" हो ग , हा बघ मी जगच तर आहे "
"दादा,  समान बाहेर काढू गाडी तून पटपट "-
"अग इरे  आपण इथे कुठे आलोय , म्हणजे आपण नवीन घर घेतलीये आणि तुम्ही लोकांनी साधे कळवले पण नाही मला "
"फार प्रश्न नको न विचारू, आधी वर तर चल"
इराला अजूनही कळत नव्हते कि याला कसे सांगायचे कि आपण कुठे आलोय ते . जे काय सुचेल ते बोलायचे इतकाच ठरवून  तिने डोर बेल वाजवली . आणि आकाश  त्याला वेगळाच tension कि दार कोण उघडेल , आई , बाबा कि आणि कुणी .....आणि समोर आल्यावर काय  किती हि नाही म्हंटले गेल्या पाच वर्ष मध्ये कधीच समोर समोर येणे झालेच नव्हते . कधी तरी फोन बस...जे काही काल्याचे ते इरा कडूनच. दार उघडले , दारात निमिष "दोस्ता, वेलकम " असे म्हणून निमिषनि कडकडून मिठी मारली , आकाशाला , आकाश  खडबडून जागा झाला  आपल्याच विचारातूनच , आणि मग त्याच्या एकदम लक्षात आले कि दरवाज्यावर पाटी होती "इरा आणि निमिष" या नावांची
"काय रे निमिष, तुला खरच मी आल्याचा इतका आनंद  झालाय कि हा आनंद दुसरे कुणी तरी आहे माझ्या सोबत , म्हणून "
"बस काय आकाश , अरे आपली गाठ आधीची , हिच्याशी  आता कुठे सूत जमलाय , गाठी- गुंता व्यायला अजून वेळ आहे  :)"
"चला, मग मी निघते रे भावा , तुमची युती आघाडी सगळे आहे तसे आहे , तेव्हा मी विरोधी पक्षात जायच्या आधी जाते "
"अग, इरा इतक्या उशिरा कुठे जातेस , आणि ती पण एकटी . थांब कि , का तुझा भावी नवरा काय चहा -कॉफी देतोय का बघू या कि "
"नको रे , घरी उगाच दंग होईल उशिरा गेले तर , तुला तर माहीतच आहे .... घर डोक्यावर घेतील सगळे जण. तू झोप इथे मस्त, आरामात राहा"
"म्हणजे मला वर पक्षात ढकलेले दिसतंय , काय दिवस आले आहेत, बघ बाबा निम्या तूच "
"दादू...प्लीज......",
"इरा , अग ये गम्मत केली मी , लगेच असे डोळ्यात पाणी काय आणि तसाही तुझेच घर आहे  न  आहे मग मी राहीन  निवांत आणि तुझ्या या होणार्या नवऱ्यावर लक्ष पण ठेवीन जा तू सावकाश आणि ए ठोम्ब्या जा तिला सोडून ये खाली"
"दादा , उद्या दुपारी जेवेयाला भेटू , मी सकाळी फोन करते . गुड नाईट"
आकाश  , घर पाहत होता , त्याची आणि इराची आवड निवड किती सारखी होती , दोघांकडे असलेली
सौन्दर्य दृष्टी सुद्धा सारखीच असावी याचे त्याला खूप कौतुक वाटत होत , तेवढ्यात निमिष परत आला.
"खूप बोलायचे आहे रे तुझ्याशी आकाश , तुझ्या या लाडक्या बहिणाला लागांसाठी तयार करायला फार कष्ट घ्यावे लागले बाबा मला, शेवटी तूच धावून आलास देवासारखा ",
"मग काय करणार , तुम्ही दोघे असे हट्टी, मला लक्ष घालावाच लागले . अरे पण तू एकटाच कसा इथे , काका काकू नाही आलेत का इथे अजून ?"
"आले आहेत रे , उद्या भेटतीलच आपल्याला , आता झोपू आपण . तुझी रूम तुझ्या बहिणीने छान अवरलिये. गुड नाईट"
आकाश खूप थकला होता आणि म्हणूनच त्याला गाढ झोप लागली .
" ओ भाऊ राया , आता उठता का आपण , सुर्व्या आल्या डोईवर "
"उठतो ग आक्का , पाच मिनिट ,.."
आकाश ला वाटले कि हि बाय खरच आलीये कि स्वप्न पडलाय आपल्याला , म्हणून त्याने डोळे उघडले , तर समोर कुणीच नाही :). अधून मधून  हे असे स्वप्न पडायचे त्याला
क्रमश :