Wednesday 3 June 2015

एक गोष्ट त्यांची पण !!!


रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे   निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही .
पण आज मात्र वेळ पळत नव्हता  अन  विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते . पण ....इरा सतत घड्याळाकडे  बघत होती , कोणत्या हि क्षणी तो बाहेर येयील , आपल्याला काय वाटेल त्याला पाहिल्यवर हेच तिला झेपत नाही असे वाट होते
 इराला कंटाळा आला आहे असे वाटे पर्यंतच .....तो आला "इतक्या वर्ष नंतर पण तो अजून तसाच , तेवढ्याच वयाचा कसा काय दिसू शकतो"....... "इरा............", त्याचा त्या उत्साही सादेने तिची विचार शृंखला तुटली.... " अग ये इकडे तिकडे काय बघातीयेस...ओळख आहे ना......, कशी ग तू अशी कायम आपल्याच नादात, तुझ्या पार्टनर ला पण अशीच पकवतेस का ग , आपल्यातच हरवून :) "
आकाश बोलतच होता अन इराला काय बोलायचे , काय कारायाच्रे तेच सुचत नवते....आणि हा मात्र मधली सगळी वर्षे गायब करूनच आला होता जणू काही

इराला त्याचा " पार्टनर " शब्द खटकला , तिच्या या आवडत्या पुस्तकावरून आकाश तिची खूप खेचत असे , आणि तुला दुसर्याच क्षणी त्यातलाच संदर्भ तिला आठवला "पाठीला पाठ लावून आलेली भावंडे "
"अहो बहिणाबाई , बघतच  बसणार कि मला घरी पण नेणार आहेस ?"
"अरे , sorry  एकदम बराच काही आठवले आणि काही सुचलास नाही रे , किती वर्षे झाली रे तुला बघून, चल लगेच निघू यात "

" तुला बरे पाठवले कि आई नि , स्वतः गाडी घेवून, लग्न दहा दिवसावर आलाय आणि , अर्थात तुझ्या हट्टापुढे कुणाचे काय चालणार म्हणा , तशी पण तू आमची लाडोबा आहेस , कोण कोण डेरे दाखल झालाय ग ?, काही पण म्हण तू मस्त वाटती आहेस आता , आय मीन online दिसतेस त्या पेक्षा , मला खरच नाही वाटत आहे कि तू इतकीमोठी झालीयेस , मला अजून पण ती शाळेच्या गणवेश मधली आठवतेस ग ......किती वर्षे गेली न उडून ...अत्तारासारखी"

इरा सफाईने गाडी चालवत होती , मुंबई - पुणे तिचा जणू रोजचा रस्ता होता , तिला असे वाटले कि तिला जी मधली वर्षे  सतत डाचत आहेत , जाणवत आहेत , ती याची गावी नाहीतच जणू मुळे, कसे जमते ह्याला हे , पण तो जे बोलतोय ते अगदी मनापासूनच , त्याला आत एक बाहेर एक जमलाच नाही मुळात ....आणि याच्या या प्रश्नांची  काय उत्तरे देणार , घर तर पाहुण्यांनी भरलाय , पण याच्या साठी कुठे जागा आहे त्यामध्ये, कसे सांगायचे याला कि याची सोय कुठे केलेय ते ... जावू दे आता नकोच काही बोलायला या बद्दल ....
"अग  तू काय मौन व्रत घेतले आहेस कि काय ?"
"अरे नाही , लक्ष जर  traffic  कडे होते, तू सांग कसा आहेस आणि प्रवास  कसा झाला तुझा ? तुला भूक लागली असेल तर थांबू आपण,  नाही तर मागे डब्या मध्ये लाडू आणि sandwitches  आहेत घे न तू "
"लाडू , अरे वा आई नि केलेले दिसतात "
"नाही रे , मीच केलेत , बघ हा ...काही झाले तुला तर तुझ्या जबाबदारी वर खा"
"बाप रे , असू असू दे तेवढी रिस्क घायला काय हरकत आहे तुझ्या बद्दल, तो जो सो called तुझा पार्टनर आहे ना निमिष नावाचा , त्याच्या रिस्क पुढे हे तर काहीच नाही :)
"आकाश , तुला कानपिळी  साठी बोलवले आहे विसरू नको आणि तू झोप थोडा वेळ , पुणे आले कि उठवते तुला " इरा नि मस्त पैकी  आवडती गाणी लावली आणि ..
आकाश थकला  होता , कित्येक मैलांचे आणि वर्षांचे अंतर कापून तो आला होता , दमला होता , झोपून पण गेला
आणि मग इरा , समोर रस्ता , गाणी आणि सोबतीला असंख्य विचार ....हा खरच आला , केवळ आपल्या साठी , म्हंटले तर कसलाच पुढचा मागचा विचार न करता ....आणि एकी कडे फक्त माझाच विचार करून .....
का बोलावले मी याला , मला आत्ताच का गरज वाटली याची . खर तर मी जेव्हा जेव्हा अडखळले , गोंधळले तेव्हा तेव्हा हा होता . पण आता असा काहीच नाहीये , मी निमिष ला स्वत निवडलाय .
त्याला मी आणि आकाश किती वर्षे ओळखतंय , पूर्ण वेळ देवून, आणि विचार करून हे लग्न ठरलाय . तरी मला आकाश येई पर्यंत इतके बैचेन का वाटत होते , आणि आता तो आहे तर उगाचच मन भरून आलाय आणि जर बरे वाटतय ........अरॆऎऎऎए
"इरा , लक्ष कुठाय , सावकाश चालव , कंटाळा आला असेल तर आपण थांबू पाच मिनिट . बाई साहेब लग्न आहे तुमचे विसरू नका आणि जर जमले तरी माझी पण काळजी करा ..."
अरे सॉरी, परत नाही होणार असे , आणि नको थांबायला , पोचत च आलोय आपण , अजून अर्धा तास फार तर , तू झोप  . त्याने परत डोळे मिटले. तरी मन थोडेच झोपणार  ते तर जागेच , किती विचारांचे काहूर माजले होते त्याच्या मनात. खर तर त्याला इतक्यात कुणा समोरच परत यायचे नव्हते , प्रश्न चुकवावे असे म्हणून नाही तर उत्तरे द्यायचा कंटाळा आला होता म्हणून .
"मी  आलो आता सुद्धा  केवळ या पोरी साठी . किती माया आहे  तिची आपल्यावर , आणि किती विश्वास . भावा पेक्षा मैत्रीच नाते म्हणूनच अधिक घट्ट . पण आपल्या येण्यामुळे वातावरण गढूळ तर नाही न होणार . केवळ इराचे लग्न आहे म्हणून  , हे प्रश्न निसटतील . जावू दे मी माझ्या परीने प्रयत्न करीन कि  लग्न घर अगदी आनंदी असेल , जसे असायला हवे तसाच .'
 " बंधूराज , उठा !!! हम अपनी मंझील पोहोच गये " .
" हो ग , हा बघ मी जगच तर आहे "
"दादा,  समान बाहेर काढू गाडी तून पटपट "-
"अग इरे  आपण इथे कुठे आलोय , म्हणजे आपण नवीन घर घेतलीये आणि तुम्ही लोकांनी साधे कळवले पण नाही मला "
"फार प्रश्न नको न विचारू, आधी वर तर चल"
इराला अजूनही कळत नव्हते कि याला कसे सांगायचे कि आपण कुठे आलोय ते . जे काय सुचेल ते बोलायचे इतकाच ठरवून  तिने डोर बेल वाजवली . आणि आकाश  त्याला वेगळाच tension कि दार कोण उघडेल , आई , बाबा कि आणि कुणी .....आणि समोर आल्यावर काय  किती हि नाही म्हंटले गेल्या पाच वर्ष मध्ये कधीच समोर समोर येणे झालेच नव्हते . कधी तरी फोन बस...जे काही काल्याचे ते इरा कडूनच. दार उघडले , दारात निमिष "दोस्ता, वेलकम " असे म्हणून निमिषनि कडकडून मिठी मारली , आकाशाला , आकाश  खडबडून जागा झाला  आपल्याच विचारातूनच , आणि मग त्याच्या एकदम लक्षात आले कि दरवाज्यावर पाटी होती "इरा आणि निमिष" या नावांची
"काय रे निमिष, तुला खरच मी आल्याचा इतका आनंद  झालाय कि हा आनंद दुसरे कुणी तरी आहे माझ्या सोबत , म्हणून "
"बस काय आकाश , अरे आपली गाठ आधीची , हिच्याशी  आता कुठे सूत जमलाय , गाठी- गुंता व्यायला अजून वेळ आहे  :)"
"चला, मग मी निघते रे भावा , तुमची युती आघाडी सगळे आहे तसे आहे , तेव्हा मी विरोधी पक्षात जायच्या आधी जाते "
"अग, इरा इतक्या उशिरा कुठे जातेस , आणि ती पण एकटी . थांब कि , का तुझा भावी नवरा काय चहा -कॉफी देतोय का बघू या कि "
"नको रे , घरी उगाच दंग होईल उशिरा गेले तर , तुला तर माहीतच आहे .... घर डोक्यावर घेतील सगळे जण. तू झोप इथे मस्त, आरामात राहा"
"म्हणजे मला वर पक्षात ढकलेले दिसतंय , काय दिवस आले आहेत, बघ बाबा निम्या तूच "
"दादू...प्लीज......",
"इरा , अग ये गम्मत केली मी , लगेच असे डोळ्यात पाणी काय आणि तसाही तुझेच घर आहे  न  आहे मग मी राहीन  निवांत आणि तुझ्या या होणार्या नवऱ्यावर लक्ष पण ठेवीन जा तू सावकाश आणि ए ठोम्ब्या जा तिला सोडून ये खाली"
"दादा , उद्या दुपारी जेवेयाला भेटू , मी सकाळी फोन करते . गुड नाईट"
आकाश  , घर पाहत होता , त्याची आणि इराची आवड निवड किती सारखी होती , दोघांकडे असलेली
सौन्दर्य दृष्टी सुद्धा सारखीच असावी याचे त्याला खूप कौतुक वाटत होत , तेवढ्यात निमिष परत आला.
"खूप बोलायचे आहे रे तुझ्याशी आकाश , तुझ्या या लाडक्या बहिणाला लागांसाठी तयार करायला फार कष्ट घ्यावे लागले बाबा मला, शेवटी तूच धावून आलास देवासारखा ",
"मग काय करणार , तुम्ही दोघे असे हट्टी, मला लक्ष घालावाच लागले . अरे पण तू एकटाच कसा इथे , काका काकू नाही आलेत का इथे अजून ?"
"आले आहेत रे , उद्या भेटतीलच आपल्याला , आता झोपू आपण . तुझी रूम तुझ्या बहिणीने छान अवरलिये. गुड नाईट"
आकाश खूप थकला होता आणि म्हणूनच त्याला गाढ झोप लागली .
" ओ भाऊ राया , आता उठता का आपण , सुर्व्या आल्या डोईवर "
"उठतो ग आक्का , पाच मिनिट ,.."
आकाश ला वाटले कि हि बाय खरच आलीये कि स्वप्न पडलाय आपल्याला , म्हणून त्याने डोळे उघडले , तर समोर कुणीच नाही :). अधून मधून  हे असे स्वप्न पडायचे त्याला
क्रमश :

3 comments:

  1. खूप खूप अभिनंदन!
    गोष्टीने उत्सुकता वाढवली आहे, पुढच्या भागाची वाट पहात आहे.

    ReplyDelete
  2. Chaan..! Vishay changla nivdlaes..ani bhatti jamalie..!

    ReplyDelete
  3. Nice! Waiting for the next part :)

    ReplyDelete