Monday 22 June 2015

एक गोष्ट त्यांची पण :भाग ६

एक गोष्ट त्यांची पण :भाग ६ 

आकाश ला येवून खरा तर एखादा दिवसच झाला होता , पण  त्याला मात्र आपण किती तरी दिवस इथेच आहोत असे वाटत होते , क्षण भर हि पिच्छा न सोडणारे  विचार आणि भूतकाळ . त्याला  वाटले कि आपण तिकडे दूर एकटे होते पण तरी मन इतके बेचैन नाही झाले कधी आणि आता आपल्या माणसांमध्ये  आलोय तर , पण असच असते बहुतेक. मी किती हि वरून दाखवले कि मी शांत आहे तरी खळबळ आहेच कि मनात . लहानपणी असे कधी सुद्धा वाटले नाही कि असे काही प्रश्न आपल्या समोर उभे , राहतील ज्यांची उत्तरे मिळून सुद्धा , न मिळाल्या सारखी , आणि नवे प्रश्नच उभे करणारी . सगळ छान चालले होते कि , सुखवस्तू कुटुंब , उत्तम शिक्षण , सुशिक्षित आई वडील आणि एक गोड बहिण , आणि काय हवे . आणि अनु शी लग्न ठरले तेव्हा पण , एक सुशिक्षित, हसमुख आणि घरच्यांना आपलीशी वाटणारी आयुष्याची  साथीदार , सारे काही अगदी "परफेक्ट". पण मला परफेक्ट असे कधीच काही नको होते  मला बस समाधानी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारे आयुष्य हवे होते . मला कधी वळणाचे, घाटाचे रस्ते ,मानवलेच नाहीत , मग आयुष्य तरी कसे मानवेल . त्याला वाटले आपण पाच वर्ष मध्ये एकदा जरी येवून गेलो असतो , तर मन मोकळे झाले असते . आकाश निरभ्र झाले असते . आत्ता ,म्हणजे असे आहे कि आभाळ भरून आलाय , आकाशाला काळ्या मेघांनी झाकून टाकलाय आणि पाऊस बरसावा असे वाटतय आणि तो तर तर काही मनावर घेत नाहीये . 
 मनानी थकलेला माणूस झोपेच्या आहारी जातो खरा ,  पण मन जगच राहते .  आकाशाला लवकर जग आली आणि आपले आवरून तो खाली आला , सकाळी एक छाकर मारून यावी असा त्याचा विचार होता . त्याला काय वाटले कुणास ठावूक पण त्याची पावले आपोआपच हॉस्पिटल  कडे वळली . त्याच्या लक्षात आले कि निमिष आणि इराचे घर हे हॉस्पिटल पासून जवळ आहे, आणि त्याच्या आणि आपल्या आई बाबांना  पण तसे काही दूर नाही . 
"आकाश "
आपल्याला कोण हक मारताय असे त्याला वाटले आणि त्याने वळून पहिले , अरे विनीता मावशी . 
"काय रे , आकाश , ओळख लागतीये का माझी ?"
"काय ग मावशी , तुला विसरून कसे चालेल मला , खाल्ल्या दही-वड्यांना आणि औषधान तरी जगले पाहिजे मला. पण एक सांगू , मी गेलो न तेव्हा जेवढी तरुण होतीस त्या पेक्षा आता वातातीयेस खरे  "
"कंठ फुटला म्हणायचं तुला, तू पाठवलेला ipod वापरते बघ मी . हे बघ रोज सकाळी फिरायला येताना छान उपयोग होतो मला . आणि काय रे माझी खेचतोस काय तरुण दिसते म्हणून . बर मला संग कसा आहेस तू ? आता असे कर माझ्या बरोबर घरीच चल, सकाळचा नाश्ता  आमच्या सोबत कर , काल  चुकला आहेस तू " 
"अग  पण , निमिष  आणि इरा माझी वाट बघतील आणि कदाचित आज आई पण भेटेल"
"म्हणजे , तू जून घरी गेलाच नाहीयेस ?"
"नाही आग निमिष पण एकटाच आहे , आणी लग्न घरात माझी विश्रांती पण नसती झाली न म्हणून "
"हं , लक्षात येतेय रे माझ्या "
"एक काम कर, तू त्यांना फोन करून माझ्या  घरीच  बोलव , नाही तर तू नष्ट कर आणी मग जा त्यांच्या सोबत बाहेर "
"बर , चल , मी कळवतो त्यांना . तसे मला तुझ्या सोबत पण खूप गप्पा मारायच्या आहेत "
आकाश मागच्या वेळी विनीता मावशी कडे आला होता तेव्हा आणू त्याच्या सोबत होती , मावशीने जेवायला बोलावले होते , खर तर तिने सगळ्यांना बोलावले होते , पण आई - बाबा नाही म्हणाले , म्हणजे त्यांना जमत न्हवते . मग इरा पण नाही म्हणाली , घरी आजी जवळ थांबते असे म्हणाली आणी नाही आली . विनीता मावशी खर तर आईची द्साहाकारीच न्हवे, तर खूप जवळची मैत्रीण . तिला एक मुलगी होती , पण ती लहानपणीच दगावली , त्यमुळे मावशीने अगदी  स्वतच्या मुलांसारखे प्रेम केले आपल्यावर . खर तर तिची मुलगी असती तरी तिनी आपल्यावर तितकाच प्रेम केले असते , तिचा स्वभाव च मायाळू . इरा वर तर विशेष जीव तिचा . मी गेलो तेव्हा म्हणाली होती 
"आकाश , जायचे तर जा तुला , पण वर्ष भारत परत ये . मला , इराला आणी तुझ्या आई बाबा न पण तू हवा आहेस . तुझे मन शांत झाले कि ये . आणी फक्त इतकाच लक्षात ठेव कि माणूस परीस्तीही प्रमाणे वागतो ,  आणि  काही लोकांना थोडा जास्त स्वार्थ असतो , काही लोकांना कमी . पण म्हणून एकदम कुणालाच दोषी ठरवू नकोस . इराची काळजी मी आणी आई घेवूच . तू जा निवांत "
"ये रे आकाश "
आकाश भानावर आला 
"हे काय , काका कुठे आहेत "
"बाहेरगावी गेले आहेत , येतील २ दिवसात . मी गेले नाही , तुझी आई म्हणाली कि थांब , मला तेवढाच आधार "
"हो ते पण आहेच , तुझ्या इतके जवळच तिला कुणीच नाही "
"हो रे , पण  खर सांगू इरा खूप समंजस आहे . तिने तुझ्या आई ला खूप सावरलाय , आणी बाबांना पण आणि  हॉस्पिटल पण छान सांभाळते . कधी कधी तर तिचा कामाचा उरक आणी मन लावून काम करणे पहिले कि तुझ्या आजीची आणी काकाची आठवण येते मला . म्हणजे तुझे आई बाबा आणी मी असे एकत्र जितके करायचो न तितके हि एकटे करते जबाब दारिनी आणी सगळ्या सहकार्यांशी अगदी छान वागते . गर्व जसा नाहीच तिला . खर तर दुर्गम भागात जावून प काम करायचे होते तिला पण नाही जावू शकली , पण आमचे कॅम्पस घायचे काम तिने सुरु ठेवलाय आणी वाढवले पण आहे. पैसे  , प्रसिद्धी , यश या सगळ्याचे काही वाटत नाही तिला  "
"मावशी , हे मी का तुला सांगायला पाहिजे कि रक्तातच आहे तिच्या ते . खर सांगू मी गेल्या ५ वर्षात  तुम्हा सगळ्यांशी बोलत होते , पण इकडे खर काय घडले  होते काय माहित "
"सुरवातीला त्रास  झाला सगळ्यांनाच . तुझी आई तर , फारच अस्वस्थ होती . पण इरा , तिला नक्की काय झाले ते काळातच न्हवते न , कि तुझे आणि अनुचे असे काय बिनसले ते . तू तिला इतकाच सांगितलेस कि तुला परदेशी जायचं आणि तिला जायचे नाहीये , आणि त्या मुळे  होत आहेत . तिला सुरवातीला पटतच न्हवते , मग हळू हळू आम्ही तिला  समजावले  , तू पण तिच्याशी बोलतच होतास . मग हळू हळू ठीक झाले सगळे . "
"हो मला माहितीये , ती लागांसाठी पण तयार न्हवती . म्हणून निमिष नि पण तिला लवकर विचारले नाही , थांबला तो . म्हणून मग मीच बोललो तिच्याशी . खर सांगू का ,  मी जेव्हा गेलो तेव्हा फार काही ठरवले न्हवते स्वत बद्दल "
"मग , आता ठरवले कि नाही ? आई तुझी विचारेल कि नाही माहिती नाही , पण मीच विचारते तुला हक्काने . "
"लग्न बद्दल म्हणत असशील , तर खर  सांगू का . पाच वर्ष पूर्वी काहीच ठरवले न्हवते . म्हणजे एक अनुभव कटू आला म्हणून ते नातच नाकारणे नाही पटत मला . मी ज्या वातावरणात , देशात वाढलो तिथे असलेले लग्न संस्थेचे आणि आयुष्याच्या जोडीदाराचे असलेले नाते मला माहितीय आणि मान्य सुद्धा आहे . आपल्या सुख दुखाच्या वाटेवर साथ देणारे कुणी तरी हवाच असते कि ग आपल्याला . मनमुराद एकटे जगायला पण एक पिंड लागतो आणि कदाचित माझा तो  नव्हता . पहिले एक वर्षे असाच गेले , सेट होण्यात . मग हळू हळू मी रमलो अग . मी लग्न मुद्दामून टाळले नाही , पण फारसे कुणी आयष्यात डोकावले नाही आणि कुणी आले हि नाही तसे कि लग्न करावे "
"खरे आहे , आपण नाती लादून नाही घेवू शकत स्वतावर . आणि तुझी तयारी दिसली नः म्हणून आई नि पण काही लक्ष नाही घातले तुझ्या "
"मावशी , पण आई नि कधी मोकळे पानांनी मला विचारले सुद्धा नाही . मी एक दोन वेळा सुरवातीला म्हणालो सुद्धा कि तुम्ही कुणीतरी इकडे येवून जा . पण तेव्हा ते माझ्या वर थोडे से चिडले होते . आई ला तर असे वाटत होती कि तिला आणि अनु ला जणूमी गुन्हेगार ठरवले आहे आणि हाच माझा अपराध आहे . मग त दरी वाढतच गेली , इच्छा नसताना पण . तरी इरा होती म्हणून एवढे तरी संबध राहिले नाही का "
"हो , पण इरा मुळेच हि दरी निर्माण झाली न आकाश ?"
"मावशी तू सुद्धा ?"
"नाही आकाश , मी सुद्धा असे म्हणू नकोस . जसा तू तशीच ती , माझ्या कडेच कधीच भेद भाव नव्हता . पण तुला असे नाही का वाटत कि थोडा पजेसिव आणि थोडा हळवा आहेस इरा बद्दल . म्हणजे अनु आणि तुझ्या आई च्या काही काही गोष्टी न पत्न्या सारख्या होत्या . खर तर अनु ला इराची वाटणी नको होती ,  पण सुरवातीला असे नव्हते . तुझ्या आई सोबत सगळ्या  गप्पा गोष्टी, बोलणी झाल्यावर तिच्या पण हे लक्षात आले कि , तुझ्या आई ला ती सहज तयार करू शकते , या गोष्टी साठी . म्हणजे ते घर इराचे राहिलाच असते , तिला प्रेम हि मिळाले असते . पण खास करून हॉस्पिटल मध्ये अनु ला , तिच्या वरचढ कुणी नको होते आणि इरा निष्णात  डॉक्टर होणार हे आरश्य इतके स्वच्छ होते  . तुझ्या आई ला हि असे वाटले कि आपल्या या  वारास्याची हक्कदार अनुच , खर तर तू , पण तू नाकारालास म्हणून तुझी बायको . इरा च्या बाबतीत तुझ्या आई बाबांनी सगळी कर्तव्ये पार पडलीच असती , पण कदाचित कुठे तरी हि मुलगी आहे , लगन झाले कि काय माहित कुठे जाईल किंवा तिला दुर्गम भागात काम करायचे होते , तुमचा तो वारसा इरा नि चालवावा असे आई ला वाटत असेल कदाचित "
"तिला असे वाटत होते कि तिची तीव्र इच्छा होती तशी ?"
"आकाश , तुझ्या आई बद्दल तू असा विचार कसा करू शकतोस , इराची पण आई आहेच कि ती . पण मुला बद्दल कदाचित थोडी जास्त माया , किंवा मोह वाटत असेल तिला . मुलगा आपल्या जवळ राहावा म्हणून सुने ला असे अडकवून ठेवायचे होते तिला इतकाच "
"तुला पण असे वाटतय का ग कि माझे जर अतीच झाले . आणि तू म्हणालीस न कि मी हळवा आहे , आहेच मी पण तुअम्च्य सगळ्यांच्या बाबतीत आहे न , खर संग मावशी कळायला लागल्या पासून , कधी तरी तुला मुल नाही याची हौस मौज मारू दिली का ग मी , मग तुझ्या बाबतीत मी हळवा झालो तर चालते कि तुला आणि आई ला . मग इरा तर बहिण आहे माझी . आणि मी possessive नाही तिच्या बद्दल पण protective नक्कीच आहे बद्दल .  आणि अग सगळ्या  गोष्टी  मागे काही करणे असतात , परिस्थिती असते . आई बाबा तसे कायम व्यस्त  होते , आजी कर्तृत्वान खरी , पण आम्हा मुला साठी तिनी वेळ दिला . आई ला हॉस्पिटल मधेच काम करायला आवडायचे , पण बाबा आणि आजी साठी तिला कॅम्पस आणि बाकी सामाजिक कार्यात भाग घायला लागायचा .  इरा कुटुंबात आली आणि मला खूप आनंद झाला , इवलीशी छोटी शी इरा , तिच्या सोबत माझा वेळ मस्त जायचा . मला मित्र होते , पण तरी  घरातला एकटेपणा मात्र इराणीच दूर केला . आणि मला  हळू हळू आवडायला लागले तिची बारीक सारीक जबाबदारी   घायला .  शाळेत सुधा मी तिच्या बालवाडीच्या वर्गात हळूच डोकावून यायचो आणि तिला सुद्धा प्रत्येक बाबतीत मी हवाच असायचो . आणि मग वयाच्या एका अश्या टप्प्यावर , जेव्हा मी धड मोठा पण नव्हतो आणि छोटा पण , अश्या काही गोष्टी घडल्या कि मला इरा बद्दल जास्तच काळजी आणि जबाब दरी वाटायला लागली मला, काही काही माणसांशी आपले ऋणानुबंध  परमेश्वरानी च जोडून दिलेले असतात. सगळ्याच भाव बहिणीचे नाते आमच्या सारखे असतील असे नाही , पण म्हणून आमचे नाते नाकारता कसे येयील . माझी फक्त इतकीच अपेक्षा होती कि इरा कोणत्याच बाबतीत डावलली जावू नये . माझ्या जोडीदाराने , माझ्या गुण दोष सकट आणि माझ्या बहिणी सह माझा स्वीकार करावा . समजा इराचे आई वडील हयात नसते तर ,  हीच जबाबदारी घेतली नसती का ग ?"
"पटतय मला आकाश . कदाचित पाच वर्षापूर्वी जे घडले ते चांगल्या साठीच असेल . आणि तेव्हा तुझे पण वय काय फार मोठे नव्हते . आम्ही मोठ्या लोकांनी जर समजून घायला हवे होते . तुला २ वर्षात परत आणायला  हवे होते आणि इरा ला पण या आधी लग्ना  बद्दल विचारायाले हवे होते . नात्यामध्ये दुरावा येत राहतो कारण सगळेच आपल्या भूमिकेव ठाम राहतात . पण खर सांगू आकाश तुला , आम्हा मोठ्या माणसाना , पालकांना तुम्ही मुलांनी पण माफ करायला शिकले पाहिजे . आम्ही पण माणूसच आहोत . आम्हाला पण चुका करण्याची मुभा आहेच कि . आणि आमच्या पिढीला , हि जी तूंची स्पेस नावाची  concept आहे न , ती वयाच्या चाळीशी नंतर मिळाली आहे रे , त्या मुळे सुद्धा कदाचित आमचे असे झाले असेल  कि आमच्या सुप्त इच्छा , महत्वाकांक्षा , त्या वयात उफाळून आल्या . ज्या गोष्टी तरुण असताना आम्ही नाकारू शकलो नाही त्याचा उदेर्क असेल बहुधा .  आई बाबांना  एक संधी दे आणि जर कधी चुकले असतील तर समजून घे . इराचा जसा पालक आहेस न , तसाच त्यांचा हो . त्यांना त्याची गरज आहे आणि खर सांगू इरा हि जबादारी घेतीय , तिला काही अंशी मुक्त कर "
"मावशी ।"
"हो आकाश , ऐक माझे , आमंत्रणाची वाट नको बघू .  घरी जा . आणि किती पण अवघड वाटले तरी तसाच जा आणि राहा , पाच वर्ष पूर्वी सारखा . समज काही घडलेच नाही . तू नॉर्मल  वागलास न कि सगळेच तसेच वागतील  आणि पाहुणे आणि समज्ची तमा तू कधी पासून बाळगायला लागलास . लग्न मोडताना सुद्धा तू  पर्वा केली नाही मग आत का? आणि इरा साठी सुद्धा जा "
"तू म्हणतीयेस ते पटतंय मला ., मी निमिष सोबत बोलतो , त्याचे आई बाबा पण यायचे आहेत राहायला आणि बरे झालो बोललो आपण , मला आता खूप मोकळे वाटतय . म्हणजे आई  भेटेल न आता त्याचा ताण खूप कमी झालाय बघ आणि नाश्ता  पण मस्त झालाय "
" हो रे , मला पण बरे वाटले बघ तू आलास .आणि एक विचार कर , जर कुणी चांगली मुलगी , मैत्रीण असेल आणि आवडत असेल तर नक्की विचार कर . म्हणजे लग्न सर्व काही आणि आयुष्य तेच असे मी मनात नाही . पण शक्य असेल आणि मना सारखे  जोडीदार मिळाला तर हे नाते पण स्वीकार , त्यात हि मझा   आहे यार "
"मावशी , तुझे शेवटचे वाक्य सांगून गेले हा कि तू अलीकडेच परत तुज आहे तुज्पाशीचे पारायण केलेस "
" आता कसे , माझा मुलगा वाटतोस , बरोब्बर ओळखलस तू :)"
"चल मी पाळतो आता "
आकाश  मावशीच्या घरातून निघाला , असे वाटले कि भरलेले आभाळा मोकळे झालाय , आकाश निरभ्र झालाय आणि सर पडून घेल्याने मृदगंध दरवळतोय . मनाची ती प्रसन्नत घेवून आकाशनि पुढचे  पाऊल टाकायचे ठरवले 
बेल वाजली , दार उघडले , आई नि … आई आणि निमिषाच्या घरात . आश्चर्याचा धक्काच होता , म्हणजे आई भेटली कि काय बोलायचे हे तो ठरवत होता आणि अनपेक्षित  पणे तीच समोर . 
"दादू , काय रे झाले का लाड करून घेवून . मावशीनी खूप कौतुकानी खायला खटले असेल "
"हो ग ", असे म्हणून आकाश आई कडे वळला , मावशीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते 
"आई , चहा करतेस . चहा पिवून , मी आवरतो मग लगेच बाहेर पडू "
"हो करते"- आई इतकाच बोलली 
"आई , मला पण आणि आले आणि पात घालून कर "
"पाहिलेस आकाश , तुझी बहिण आता मला चहा कसा करायचे ते सांगतीये आणि ते पण का , तुझ्या साठी , तुला हवे तसा . मला आहे ठावूक ताई  साहेब "- आई 
"काय ग आई "
"बर , इरा , निमिष आणि आई तुम्ही तिघे इथे आहात तर मला काही तरी सांगायचे आहे तुम्हाला "
"काय ?"- इरा , निमिष आणि आई तिघे हि जर कालाजीनेच म्हणाले 
बाप रे आता काय सांगेल आहे , मी इथे आले म्हणून हा परत तर जाणार नाही न निघून , पण आपण हून बोलला आणि इरा साठी आलाय तर …आईच्या मनात भरभर प्रश्न येत गेले . 
दादू आईशी बोलेल आपणहून असे वाटले नव्हते , पण नोर्म वाटला मग वाढला पूर्वीची शांतता होती का ती ? असे इराला वाटले 
आणि निमिष त्याला खर तर काही सुचतच नव्हते 
आकाश नि पुढे बोलणे सुरु केले 
"अरे मी काय न्यायाधीश आहे आणि शिक्षा सुन्वणार आहे का , असे चेहरे बनवायला . निमिष पण सॉरी मित्रा "
"का रे ?"
" अरे काही नाही , मी उद्या सकाळी जायचे म्हणतोय "
"कुठे , अजून लग्नाला चांगले ८-१० दिवस आहेत कि आकाश आणि त्या साठी आलास न तू ?"- आई 
"दादू ?"
"अरे पूर्ण ऐका तरी , आई मी उद्या सकाळी आवरून येतोत आपल्या घरी . दुपारी जेवयालो येतोय मी . मी तिकडे असेन तर मला जास्त मदत करता येयील आणि इराची पण धावपळ कमी होईल . आणि निमिश्चे आई बाबा उद्या संध्यकाळ पर्यंत येत आहेत , म्हणजे त्याला पण कंपनी आहे आता . "
"आता काय बोलू मी , राहा म्हणालो तर , काकू कम सासूबाई चिडणार आणि होणारी बायको सुद्धा . आणि जा म्हणालो तर मित्र म्हणेल गरज सरो मित्र मरो "
"मला ठावूक आहे निमिष कि तुला जर त्रास होईल मी इथे न राहल्याने . म्हणजे इरा मला भेटायच्या निम्मित्ताने जास्त येवू शकणार नाही न "
"नको , तसे पण अति तिथे मत , लागणं आधीच भांडण नको , तू आपला तिकडेच राहा "- निमिष 
"ठरले तर मग ,  आई उद्या प्लीज गाडी पाठव समान खूप आहे "
"हो पाठवेन , हवे असेल तर बाबा पण येतील "
इरा खुशीत होती , तिला आपल्या भावाचे खूप कौतुक वाटले . किती छान सांभाळून घेतले त्याने , आता आई पण ख्सू आहे .  दाखवणार नाही ती , स्वभावाच नाही तीच . मी हट्टाला पेटले म्हणून इथे तरी आली .
"चला , मुलानो पटपट बाहेर पडू यात , निमिष तुझ्या आई बाबा न पण डायरेक्ट दुकानातच बोलाव . उरकून टाकू खरेदी . आणि निमिष तू आणि तुझा मित्र दोघांनी आज आटपा काय ते  "
संथ पाणी वाहते झाले  होते , अर्थात आरश्य इतके स्वछ नक्कीच नाही  . आई आकाश च्या निर्णय बद्दल काहीच बोलली नाही . आकशाला खरेदी करायला सुचवून , एक प्रकारे त्याच्या येनचे स्वागत केलेच होते तिने , पण घरी येण्या बद्दल ती मौनच होती . पण येवू नको असे हि नाही म्हणाली . 
इरा खुशीत होती , आई गप्प होती , निमिष थोडा confuse होता कि आकाशाला जमेल का तिथे राहायला , आणि आकाश , सगळ्या भावना मिसळून गेल्या होत्या , घरची ओढ , इरा  सोबत त्या घरात राहण्यातली गम्मत , आई बाबा कसे स्वीकारतील आपले येणे,  याचा थोडा तणाव , पण  तरी त्याला छान वाटत होते . परीक्षे मध्ये पेपर चांगले  गेले कि कसे निवांत वाटते , पण निकालाची हुरहूर राहतच न ते काही तरी 
सगळे काही छान होईल , असे मनात ठेवूनच सगळे बाहेर पडले . पाच वर्षे म्हणजे एक पिढी नि काळ पुढे सरकला .  वाटेत हॉस्पिटल लागले , आई म्हणाली दोन मिनटात येते , मग इरा पण सोबत गेली . आकाश नि सहज पहिले  बाहेर तर , मोफत उपचार विभागाचे  नामकरण झाले होते , इराणी आजी आणि काकाच्या नावाने हा विभाग , परत पुनर्जीवित केला होता . काकाची एक हलकीशी स्मृती त्याचे डोळे पाणावून गेली आणि आजीच्या मायेन डोळ्या  दाटून आले , इतके कि त्याला मिटून घ्यावे लागले . तो स्वताशी म्हणाला , इरा नि तुमची स्मृती अशी जपली आणि मी …मि तूंची स्मृती जपेन आयुष्यभर , माझ्या पद्धतीने 
क्रमश :

 Sheetal J 

1 comment:

  1. नात्यांमधली घालमेल उत्तम रेखाटली आहे. मला ही सोडून दिलेले लिखाण सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
    अभिनंदन

    ReplyDelete