Friday 12 June 2015

एक गोष्ट त्यांची पण - भाग तीन


एक गोष्ट त्यांची पण - भाग तीन 

थोडेसे पूर्वीचे , संगती लागावी म्हणून :

आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण"  . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती,  दिसली तीच हि बाग   , आणि त्याला एकदम आठवले  , असे वाटले कि इरा  आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. "  आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा …… 
" आकाश , अरे काय झाले ……… इरा कुठे दिसली का तुला ? आणि इतका का घाबरून ओरडत आहेस ? काय झाले काय ? , पाणी पी थोडे , तुझ्या शेजारी आहे बघ बाटली "
"सॉरी , अरे काही नाही असच, असे वाटली कि इरा पडतीये खाली जोरात आणि मी पोचे पर्यंत …।"-निमिष 
 " अरे , तू इतका आणि तो पण असा विचार नको करू, आणि मध्ये कुठे इरा पडतीये वगैरे , लहान आहे का ती आत्ता , आणि हो माझ्या प्रेमात पडलीये आणि आता संसारात पडतीये म्हणून ओरडत असशील तर इराआआ---- ऐवजी आकाश सांभाळ असे तरी ओरड . पण खर संग न काय झाले कारण माझ्या पीजे वर पण हसत नाहीयेस मनापसून , बैचैन  का आहेस ?"
 "काही नाही दुल्हे बाबू , आपण  थांबलो खायला कि सांगतो "
"अरे पोचलोच कि आपण , मस्त पैकी मिसळ चापू आधी , मग ठरवू next काय ते "
आकाश आणि निमिष गाडीतून उतरले , खर तर निमिष  ला जाणवले कि काही तरी बिनसले पण नक्की काय ते  कळत नवते . अशी काय आहेत हि बहिण भावंडे , इरा पडतीये ह्या कल्पनेने पण हा केवढा बैचेन आहे , नाही तर आमचे भाऊ  खरेदी ला या म्हंटले तर आता वेळ नाही , मग वेळ नाही , तरी बरी नुसते खरेदीला मदत करायला यायचं , पैसे नाही खर्च कारयाचे आहेत . आकाश  ला विचारायला पाहिजे काय झाले ते , इतक्या वर्षांनी आलाय , थोडे मन मोकळे झाले तर त्यालाच बरे वाटेल 
"आकाश  , आता संग कि मगाशी काय झाले ते "
"काही विशेष नाही रे , ती दिसली "
"कोण ??????, म्हणजे तुझ्या इतक्या मैत्रिणी होत्या त्यातली कोण ?"
"काय रे तू पण , ती म्हणजे ती बाग . आम्ही जुन्या घरी राहायचो तेव्हा नाही का आपण सगळे जायचो ती …"
"आपण सगळे , नक्की न … खर तर आकाश  , तू बागेत जायचास तुझ्या लाडक्या बहिणी साठी आणि म्हणून आम्हाला खेळायला तिथे बोलावायाचास आणि  यायलाच लागयाचे, कारण  क्रिकेट चे किट , badminton ची राकेट हे सगळे तुझ्या कडेच होते न , बर ते जावू दे . बाग बघून ओरडलास "
"तुला आठवते का रे निमिष  , एकदा इरा झोपल्या वरून पडली होती त्या बागेत "
"हो , म्हणजे अंधुकसे आठवतोय , आपण जाम  घाबरलो होते , आणि तिला तुमच्या दवाखान्यात नेले होते . काका  ओरडले होते आपल्याला दुसर्या दिवशी । लक्ष कुठे असते तुमचे आणि लक्ष देत येत नसेल तर तिला अजिबात नेऊ नका वगिरे वगिरे "
"हो , अगदी बरोबर , अंधुक काय , स्पष्ट आठवतंय कि तुला "
"पण आकाश इतक्या वर्षांनी का आठवले तुला , आणि आठवले तरी इतके घाबरायला काय झाले आता ?, आणि तेव्हा पण काही फार लागले नवते "
'हो , फक्त चार टाकेच तर पडलेत , आणि सगळी लहान मुले अशी एकदा तरी पडतातच , त्यात काय इतके , इट्स ओके , अस आईनी ऐकवले रे मला ,. पण माझ्या साठी ते चा------र  टाके होते. तुला आठवतंय का कि आपण दवखान्यात  घेवून गेलो तील तेव्हा ती किती रडत होती आणि माझा शर्ट रक्ताने भिजला होता . अजून हि आठवते मला . आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो , लहान पाणीच्या काही काही आठवणी आपल्या पिच्छा सोडत नाही त्यातलीच हि एक , मला अह्जूनही असाच स्वप्न पडते कि इरा पडतीय आणि तिला वाचवायला कुणीच नाहीये आणि मी तिच्या पर्यंत पोचू शकत नाहीये   "
"अरे  आकाश , असे काय करतोयेस , आता किती वर्षे झाली त्या घटनेला आणि मला अजून हि कळात नाहीये कि त्याचा इतका का परिणाम झालाय तुझ्या वर . म्हणजे आपल्या प्रत्येकच्या आयुष्यात असे असतच कि कधी तरी किंवा आपली भावंडे पडलीये , त्यांना लागलाय किंवा खूप आजारी पडलीत , अगदी तू सुधा  पडला  होतास कि , हात मोडला होता तुझा , ते विसरलास , त्या मानाने इराला काहीच लागले नव्हते रे "
"हो , खरय . ए तुला आठवतंय का रे निमिष  , माझा हात मोडला होता तेव्हा मी इयत्ता ९ मध्ये  असेन आणि इरा असेल चौथी मध्ये , पण रोज माझे दप्तर कार पर्यंत स्वत : घायची , पेलायची नाही तरी , रोज डबा खायला पण आपल्या सोबत यायची , आणि रोज हट्ट करायची कि दादू मीच तुला भरवणार , खर सांगू तुम्ही सगळे खूप चेष्टा करायचा माझी , पण मला कधीच फिकीर नाही वाटली  त्याची ., का सांगू कारण आजी नंतर तसे मला कुणीच प्रेमाने भरवले नाही रे , म्हणजे आई कधी तरी असायची पण ती तरी काय करणार , तुला हॉस्पिटल , कॅम्पस या सगळ्यातून वेळच कमी मिळायचा . इरा माझी बहिण नाही , तर माझे कुटुंब आहे रे "
"ते सगळे खरय मित्रा , मला माहितीये आणि जाणवलय सुद्धा आणि म्हणूच इतक्या गोड मुलीशी मला आयुष्यभर एकत्र जगायचं , फार जीव लावते यार हि . पण इराच्या पडण्याचा अजुनही इतका प्रभाव का आहे तुझ्यावर ते सांग . विषय बदलू नको . म्हणजे त्या हि पेक्षा किती तरी अश्या गोष्टी आयुष्यात कळल्या आहेत तुला , ज्याने तू असा अस्वस्थ झालास तर मी समजू शकतो "
"विचारतोच आहेस तू निमिष  म्हणून सांगतो , कदाचित तुझा पण दृष्ट्कोन कळेल मला. आपण दवाखान्यात गेलो इराला घेवून तेव्हा , मी तर घाबरलो होतोच , पण इरा पण घाबरली होती आणि नेमके त्या दिवशी च आई , बाबा दोघे पण दवाखान्यात  नव्हते , कॅम्प साठी जवळ  असणाऱ्या एका खेड्यात गेले होते , आणि आजी  पण बाहेर गावी गेली होती . टाके सुद्धा विनीता मावशीने घातले . मी  आई ला फोन केला  होता रे निरोप द्यायला , तेव्हा काय मोबाईल  नवते , पण तिला  निरोप मिळाला होता . ती विनीता मावशी सोबत बोलली आणि मग निरोप दिला कि संध्याकाळ पर्यंत पोचतेच आहे म्हणून . आमचच  हॉस्पीटल  त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतले रे . घरात काय आमचे नोकर चाकर असायचेच सोबतीला , म्हणजे घराच्या सारखेच होते , पण …मला वाटत होते कि हातातली सगळी कामे टाकून आई नि लगेच  यावे आणि इराला कुशीत घेवून विचारावे कि कशी आहेस बाळा , घाबरू नकोश वगैरे . आई आली म्हणजे तशी लवकर आली . इराला जवळ पण घेतले आणि मला ओरडली पण नाही , पण इतकच म्हणाली, तुला इराची जबाबदारी घायचो असेल तर घे नाही तर आम्ही आहोतच कि काही तरी व्यवस्था करू ,  बाकी काही नाही पोरीला काही झाले तर ….  तिच्या स्वरात काळजी होते रे , पण काही तरी नव्हते . एखाया दिवशी बघ भाजीत सगळे घातले तरी चव येत नाही आणि काय राहालीये ते पण काळात नाही , असे काही तरी वाटले मला . मग काय बाबा आले आणि शाळा घेतली आमच्या दोघांची , इराची पण . इरा , आणि मी आजी च्या खोलीत झोपनर होतो त्या दवशी कारण ती खालच्या मजल्यावर होती . मला उगाच वाटले कि आई पण इरा सोबत झोपेल , पण तिला काही तरी काम होते म्हणे , कसले तरी रिसर्च चे . मला काय वाटले कुणास ठाऊक , पण मी आई ला म्हणालो , कि थांब न आजच्या रात्री इथेच , कदाचित इरा उठली तर , तिला तूच हवी असशील  आणि तुला तरी झोप लागणार आहे का ? काय आहे ते काम इथेच कर , दिवा सुरु राहिला तरी चालेल आम्हाला . तसे आई नि काही आढे  वेढे घेतले नाहीत , ती थाबली , रात्री बराच वेळ जागी होती , मध्ये मध्ये उठून इरा कडे पाहत पण होती . सगळे होते पण तरी हि , माहित नाही , असे वाटले कि  काही तरी नाहीये या सगळ्यात , काळजी आहे , जबाबदारी आहे , प्रेम ?, प्रेम सुद्धा आहे पण आई ची माया थोडी आटली  आहे का ? म्हणजे आई वाईट नाहीये , पण आज आता ती इराची आई नाही तर पालक वाटतीये , कदाचित दिवसभर दमली असेल , आणि इतके काही जास्त लागले पण नाहीये , त्यात आई डॉक्टर म्हणजे तिला खरच किती लागलाय हे कळते ना म्हणून पण कदाचित ती …, "
"अरे , हो आकाश  पण तरी हे सगळे तुझे विचारच ना  आणि तुला नक्की काय खटकले , आई लवकर आली नाही हे का ?"
"नाही ,  ती कामात होती आणि इरा वर उपचार झाले होते आणि आजच्या इतकी दळण वळणाची साधने पण नवती तेव्हा , त्यामुळे ती या पेक्षा लवकर येवूच शकली नसती आणि ती विनिता मावशी सोबत दोन वेळा बोलली पण होती . मला काय खटकल माहितीये "पोरीला काही झाले तर ", मधला काळजीचा स्वर , काही तरी वेगळा होता , संकटात पडल्या सारखा आणि तिचे आपणहून रात्री न थांबणे . मी म्हंटल्यावर  लगेच थांबली ती , म्हणजे तिने तसे इराला झोपवले होते , पण तिने आपणहून थांबायला हवे होते . तेव्हा पासून मला पक्के डोक्यात बसले कि  आता   इरा माझी जबाबदारी आहे , तिच्या साठी कुणी थांबो अथवा न थांबो , मी आहे , माझ्या इरा साठी . नेहमीच त्या घटनेने मला ह्याची जाणीव दिली म्हण किंवा त्या एका प्रसंगात माझे आणि इराचे नाते बदलले असे म्हण , म्हणूच कदाचित आता इतके सगळी स्पष्टीकरणे  मिळून सुद्धा  हि ती घटना माझ्या मनात पक्की बसली आहे . कधी कधी हातातून काही निसटते आहे असे वाटले कि मला असाच स्वप्न पडते . आता कारण म्हणजे ती बाग इतकाच . जावू दे आपण फारच गंभीर विषयाकडे  वळलो, पण तू विचारलास मला बरे वाटले. कधी कधी प्रश्नाची उत्तरे मिळाली कि नवीनच प्रश्न समोर येतात , आणि उत्तरे बरोबर असून हि पटत नाहीत .    "
" मित्रा , काळजी नको करू , मी तुझ्या इराला कधीच दुखावणार नाही , जरा  भावूक झालोय म्हणून सांगतो , विश्वास ठेव "
"अरे ए आकाश , भावूक हो तू , पण एक लक्षात ठेव , दहेज मे  हम आ राहे है . मी काळजी गेईन असे म्हणून मला कटवु नको, कट  करून "
"नाही रे , तुला न कटवता , मिसळीचा कट  मागवतो  "
"अरे , दुपारी  कुठे जायचं रे आकाश  "
"मेनू ठरवायला, अरे तोच नेहमीचा हॉल ,तुझ्यावेळी ठरवले होते कि तेच रे …I am sorry , चुकून बोललो कि तुझ्या वेळी असे   "
"असू दे रे , बित गायी बात गयी ,आणि असे काही नाही , इरानि   सांगितलं मला कि लग्न केले आहे तिने …"
"इरा म्हणजे न , अवघड आहे , मी म्हंटले होते तिला कि आकाश ला काही बोलू नकोस . तू आधीच तिकडे एकटा , त्यात उगाच पुन्हा जुन्या आठवणी त्यापाणु कटू आठवणीना उजाळा कशाला द्या "
"नाही रे , इतके काही नाही  वाटत मला , आणि तसे पण जो काही निर्णय आम्ही  दोघांनी घेतले त्याचे वैषम्य नाही आहे मला . जे झाले ते योग्यच होते . माझे आणि तिचे आयुष्य एकत्र कधीच सुखाचे झाले नसते. न माझ्या , न तिच्या आणि ना …  कुनाच्याच . आई आणि बाबांना खूप मनस्ताप झाला, त्यांना मला समजून घेणे तेव्हा पण जमले नाही आणि आता पण त्यांच्या  आवाक्या बाहेरचे आहे सगळे .  आणि इराची तेव्हा पासून कसरत सुरु झाली , आई बाबा आणि मी अशी नात्यांची तारांबळ .  "
"अरे पण , तिला पण नकोच होते क हे लग्न , नाही तर तिने परत कशाला लग्न केले असते , ते पण प्रेम बिमात पडून . आणि मग आता काका काकुना काय प्रोब्लेम आहे , हे तर माहितीये न कि तू काय फक्त एक मार्गी लग्न मोडायचा निर्णय घेतला नव्हतास "
"निमिष , फक्त ते आणि तितकाच कारण असते तर मग कशाला , आमच्या या नात्याला खूप कंगोरे आहेत आणि म्हणूच गुंता पण मोठा आहे . लग्नासाठी नकार किंवा त्याची करणे हे आणि इतकाच आमच्यातल्या तणावाचा कारण आहे असे वाटते तुला . खूप वर्षापासून हा तणाव होता आमच्यात ,  हे एक निम्मित झाले फक्त कि तो तुम्हा सगळ्या समोर आला . असे बराच काही आहे अजून . जावू दे , परत गंभीर विषय नको आणि मला पण एन्जॉय  करायचे आहे तुमचे लग्न . मी त्या साठी आलोय न इथे आणि तसाही तू फार वेळ गंभीर संभाषण करू नाही शकणार . आता आपण तुझ्या भाषेत 'सुंदर पैकी चहा घावू आणि सुंदर पैकी तुझी काम उरकू "
"अरे म्हणजे आय अति महत्वाची कामे आहेत , माझे shopping राहिलंय अजून , साला कुणाला वेळच नाही यार . बरे झाले तू आलास , आता तुलाच राबवतो "
"रोजगार हमी योजनेवर आल्यासारखे वाटतय मला . फ़ोरेन रिटर्न वेठ बीगार . पण निमिष , कमीत कमी तुझ्या आई बाबा न तर घेवू यात न बरोबर जाताजाता "
"ते काही तरी वेगळ्या गडबडीत असतील , हा होम ते हवन . यांना पत्रिका द्यायची , आमंत्रणे बाकी आहेत वगैरे "
"अरे पण विचारू तर खरे , मी विचारले तर नक्की येतील बघ . आणि काकुनी काय लाडू बीडू  बनवालते  त्याची चव पण चाखता येयील "
"मग चल, तसाही आई नि काळ पासून १०० वेळा तरी मला सांगितले आहे आकाश ला काय हवे नको ते बघ आणि त्याच्या सोबत घरी एखादी चक्कर टाक  म्हणून "
"चल मग , म्हणजे वेळेत काम करु नाही तर ती आमची बया  ४ म्हणजे ४ ला हजर होईल आणि माझे डोके खाईल " 
" ए थांब निमिष  , इराला फोन करतो , जरा गम्मत , कश्यावर ताव मारतिये ते तर कळेल…लागला फोन, ए काय ग काय  खातीयेस तरी काय ? इकडे आम्हाला सोडून , माझा नाही भावाचा तरी  विचार करायचास   "
"अरे ए , निमिष आधी फोने वर हेलो  तरी म्हणत जा , लगेच काय चौकश्या , फोन कुणी पण उचलू शकतो . आणि फालतू गप्पा नकॊ, काही काम असेल तर सांग , मी आता विनीत मावशी कडे खाण्यात बीझी आहे , कळले . आणि काम नसेल तर ठेव फोन , नाही तर मीच ठेवते ?"
"काय ग इरा , निमिष  चा फोन वाटते , अग मी त्याला पण घेवून ये म्हणाले होते "- विनिता मावशी 
"नको ग, त्याला कशाला , नंतर आहेच कि मग लग्न नंतर , सारखे  त्याचेच कौतुक करता मग तुम्ही लोक ,  दहीवडे मस्त झालेत एकदम "
"आकशाला पण खूप आवडतात न ग , खर तर म्हणून केले , उगचाच वाटले कि तो पण येयील आणि म्हणून चौघांच्या आवडीचे पदार्थ केले न मी . तो एकटाच चुकला बघ . येणार आहे का नाही तो ? आता तुझे लग्न म्हणजे येणारच म्हणा , पण आज चुकला बघ "- विनीता 
"मावशी , तू घरचीच आहेस , म्हणून खोटे नाही बोलत , तो कालच आला आहे "
"इरा……"- इराची आई 
"ए बोलू दे ग तिला , बोल ग इरा तू . कधी आलाय आकाश आणि त्याला का नाही आणलस मग , तो काय परका आहे का ? आणि त्याला माझ्या कडे आणायला काय प्रोब्लेम आहे . तुला माहितीये न कि मला तुम्ही दोघे मुलासारखेच आहेत आणि तू नुसते सांगितलास असतास न तर माझ्या आमंत्रणाची वाट पण पहिली नसती त्याने आणि आई ला घाबरता का तुम्ही अजून पण . ती काय म्हणाली असती तर मी सांगितले असते का ते . तुम्ही चौघे आहात तिघे नाहीत कुटुंब म्हणून किती वेळा सांगितलाय मी तिला . जावू दे बेटा , त्याला संग येवून जायला , जमेल तसे "
"अग मावशी , तो आला असता का ग , पण काळ रात्री उशिरा आलो न , आणि आज आकाश आणि त्यांचे मित्र भेटणार होते कोण कोण म्हणून मीच नाही आणले त्याला . आई बाबाचे काही नाही ग तसे "
"असो , या निम्मितने का  होईना , तो घरी आलाय , बरे वाटले . बर मी त्याच्या साठी न देते सगळे थोडे थोडे डब्यातून , तू घेवून जा हा "
इरा विचारात होती कि मावशीला जर आकाश यावासा वाटला तर आई बाबा का नाकी म्हणले . मावशी काही आमची नातेवाईक नाही पण खूप जवळची आहे , माल आणि आकशा ला तिने लहान पण पासुन पाहिलये , मग ती जर आकाश ला माफ करू शकते तर आई बाबा का नाही ?  कधी तरी मला जमेल का मला हे सगळे परत पहिल्या सारखे करायला . लहानपणी एकदा चित्र काढायला घेतले आणि मधेच जर खोडले  न तर असे वाटायचे कधी कधी कि पहिलाच चांगले आले होते , आता परत तसच काही जमायाचे नाही , तेव्हा आजी म्हणायची , कि बाळा  चिडचिड करू नको , थोडा वेळ काहीच करू नकोस आणि मग परत नवी सुरवात कर . तसा अजून थोडा वेळ देवून नवीन सुरवात करावी लागणर का मला ?, आकाश- इरा आणि आई -बाबा  अश्या समांतर रेषा झालाय आहेत जणू , एकाच प्रतलात कधीच न मिळणाऱ्या … 
"इरा , काय करायचं , तू खरच आकाश ला डबा देवून येतेस का ? आम्ही जातो घरी "- आई 
"नको , उगाच हेलपाटा मला , तसे हि आपण त्याला सांगितले नव्हते आणि आत उगाच  कशाला ?"
"पण मावशीनी इतका प्रेमाने दिलाय आणि त्याला आवडतात न ग …………" - आई 
"मग तूच नेउन दे न , इतके प्रेम उफाळून  आलाय तर "
" इरा , बेटा , प्लीज , तू तरी । जावू दे , मी संगीतीये न तू दाबा देवून ये आणि तसा हि आम्ही तुला पण ऐन वेळी संगितले न हे केळवणं चे मग , त्याला पण तसाच सांग  . "
"ठीक आहे , निघा तुम्ही , मी दादू कडे जाऊन येते "
इरा  पोचली , हे दोघे अजून आलेले दिसत नाहीयेत , फोन करून यायला हवे होते . जावू दे किल्ली तर आहे , डबा  ठेवून , message करते . इराने  दार उघडले, फ्रीज उगडून त्यात डबा ठेवला आणि ती आकाशाच्या खोलीत गेली . खोली आवरलेली होती , काही वस्तू मात्र काढून ठेवल्या होत्या . आकाशानी सगळ्यासाठी गिफ्ट  आणल्या होत्या . 
हा असा कसा आहे इतका कुल , लहान पण पासून असाच आहे , इकडे आग लागली  तरी  हा असाच शांत . बर्फ पण कमी थंड असेल . मी याच्या  जागी असते तर , आई बाबांकडे येवून सरळ कचकचा भांडले असते . 
इतक्यात तिला दार उघडल्याचा आवाज आला आणि गम्मत करावी म्हणून ती आवाज न करता तशीच थांबली 
"निमिष प्लीज , हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला  यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . न्हाणून आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये  मला आकाश ?",
क्रमश : 

Sheetal Joshi

2 comments:

  1. खूप छान लिहित आहेस. मांडणी सुरेख आहे. पुढे काय ही उत्सुकता वाढत आहे.
    Fonts compatibility check कर. काही शब्द चुकीचे येत आहेत.
    हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete