Sunday 7 June 2015

एक गोष्ट त्यांची पण !!!, भाग -२


एक गोष्ट त्यांची पण !!!,  भाग -२

आपल्याला अशी अधून मधून स्वप्न पडतात , आणि कदाचित आपल्याला आवडतात सुद्धा , थोडेसे झोपेतच त्याच्या मनात हे विचार येत होते . आकाश स्वप्नाळू  कधीच नव्हता , पण हि अशी स्वप्ने त्याला आज काळ आवडायची . आपण एकटे नाही आणि आपली काळजी करणारे आपल्या जीव भावाची व्यक्ती आहे  याची जाणीवच होती ती 

पण हे स्वप्न आहे कि सत्य , पण डोळ्यांवर ची झोप अधिक प्रभावी ठरली आणि जागा झालेला झोपी गेला . इरा खरच आली होती  का ? कि परत केवळ स्वप्न आणि  भास । 
 अंदाजे २ तास तरी झाले असतील , आकाशाला जाग  आली , म्हणजे अजूनही नुसताच पडून राहावे असे त्याला वाटत होते , इरा नि येवून उठवावे आणि आपले स्वप्न खरे असावे अस हि त्याला वाटत होते , पण …. 
तो उठला , आजूबाजूला नजर फिरवली आणि एकदम प्रसन्न वाटले त्याला , घरी आल्यासारखे . काल गडबडीत त्यानी आपली खोली निवांत पहिलीच  नवती . आता पहिली आणि स्वताशीच हसला तो . 
आपल्या सगळ्या छोट्या छोट्या आवडी निवडी किती जपल्या आहेत या पोरीने . खोलीची रंगसंगती , चादरीच रंग इथपासून  ते अगदी …अरेच्चा , निशिगंध आणि गुलाबाची फुले सुद्धा आहेत कि इथे  फुलदाणीत . खर तर "फ्लॉवर  पॉट म्हण्याचे होते मला , पण इरा आठवली , इथे असती तर म्हणाली असती काय रे मराठी वापरायची लाज वाटते कि काय आता तुला :). 
 आकाश चे अलीकडे असच होत होते , सगळे संवाद स्वताशीच , विचारांच्या गर्दीत तो एकटाच :)
आकाश आवरून बाहेर आला 
"शुभ प्रभात निमिष "
"काय रे आकाश , सकाळी सकाळी  इरा चढली का तुला , शुभ प्रभात वगैरे "
 "ए , पण ती आली होती का रे सकाळी "
"नाही "
"नक्की ?"
"हो आकाश , पण तू असे का विचारतो आहेस"
"इरा नक्की आली होती , या वेळी भास नाही , खर होते ते , प्लीज , सांग ना ""

"पण तुला असे का वाटतय , कि इरा आली होती "
"हे बघ , मला निशिगंध आणि गुलाब किती आवडतो ते तिला माहितीये आणि काळ रात्री ती फुले खोलीत नव्हती आणि आता आहेत . "
"शाब्बास , व्योमकेश बक्षी , अजून तुम्ही हुशारी टिकवून आहात तर "
"म्हणजे इरा आली होती न , मग कुठाय आणि मला न उठवता का गेली ?"
"अरे हो हो , गेलीये पण येणारे , अर्ध्या तासात येते म्हणाली . आणि ब्रेकफास्ट , म्हणजे न्याहारी एकत्र करू म्हणाली . बघ ना , तुमच्या दादा- ताई च्या प्रेमात मला उपाशी ठेवलाय , जाऊ दे चहा घेणार न तू , मी करतो एकदम सुंदर पैकी चहा आणि मग देतो तुला सुंदर पैकी कपातून "
"अरे चहा तर पाहिजेच , आणि काय रे अजून हे सुंदर पैकीच वेड  आहेच  वाटते , आणि ए कम ऑन तू आणि सकाळ पासून उपाशी , थापा नको मारू आता , लग्न दहा दिवसावर आहे , सुधारा आता "
"अरे म्हणजे काय खास नाही पण खाल्लाय जर आपले उगाच एवढस,खाली जावून , इडली सांबर, वडा पाव , एक पोहे आणि दोन चहा आणि …आणि  काही नाही , बस तू मी आलोच आपला चहा घेवून"
  "वाह , निमिष , तू अगदी गृह कर्तव्य दक्ष झाला आहेस हा , चहा एकदम फक्कड , अगदी मला हवा तसा "
"काय करणार बाबा, तुझ्या बहिणीश संसार करायचा न , तुला गम्मत सांगू , ती खूप आनंदात आहे रे तू आलास म्हणून . मला दहा वेळा बजावून गेली कि तुला कसा चहा आवडतो ते , पार पकलो मी … पण मला छान वाटत होते कि या सगळ्या घडामोडी नंतर हि तुम्ही दोघे मात्र अजून हि तितकेच जवळ आहात , कदाचित जर जास्तच . मजा  सांगू तू येणार म्हणून तिने आलं  , चहा मसाला  आणि चहाची  गवती पात सुद्धा आणून ठेवलीये घरात . मला म्हणाली त्याला चहा करून दे बाकी काय हवे नको बघ  , तिकडे सगळे स्वताच करतो . आणि तिने पाण्याचा माठ भरून  ठेवलाय  काल , आणि त्यात वाळा आणि मोगऱ्याची फुले सुधा ताकालीयेत , तुला आवडतात म्हणून . मला तर वाटते , त्या बायका नवरा साठी कसे हरतालिका , वाट सावित्री वगैरे करतात न तसे अशी बहिण  मिळायला तू काही तरी व्रत केले असशील . "
"हो खर आहे हे . फार जीव आहे रे तिचा माझ्या आणि माझा सुद्धा तिच्यावर . आता तुला सोपवातोय तिला म्हणजे काळजीच नाही .  खरच , मला कळतंय रे , मी आलोय म्हणून ती खुश तर आहेच , पण मला इथे, आमच्या घरात  नसून सुद्धा , घरी आल्याचे सुख मिळावे म्हणून झटतीय ती . मला कळतंय कि मला इथे राहा असे सांगण्यात तिला खूप मनस्ताप होतोय , पण मी बोलेन तिच्या शी . I am comfortable here and she should not worry about t. She should enjoy these days and my stay in India. anyways whats pla for today "
"अरे राहा रे माझ्या सोबत मजेत , आपण पण किती वर्षात असे निवांत नाही भेटलोय , आणि माझ्या इथे तरी कोण आहे रे , आई - बाबा कधी येतील काय माहित , आज- उद्या असे त्यांचे सुरु आहे . जवळच आहे येतो वगैरे वगिरे आणि भावंडे काय आहेत पण आणि नाहीत पण .  मी पण जाम खुशीत आहे रे , आणि खरे सांगू दु:ख एकट्यानं जगू शकतो रे , पण आनंद वाटून घेणारे कुणी नसेल न तर बाकी काही उरत नाही मग, आनंद सुद्धा .  जावू दे . साला बघ तू आलास न बृहस्पती कि हे असे होते तत्वज्ञान वगैरे वगैरे . पण हे बृहस्पती  , हे ऋषिवर आपण स्नान करून घ्यावे . तो पर्यंत कुमारी इरावती आपली न्याहारी घेवून प्रवेश करेलच . तूर्तास आपण स्नानगृहा कडे प्रस्थान करावे आणि मी आपल्या बल्लावला दुपारच्या  भोजनाच्या सूचना देवून येतो"
आकाश  हसत हसतच आता गेला, निमिष काही तरी बारीक सारीक कामात होता , तेवढ्यात फोन ची रिंग वाजली , 
"निमिष, इरा बोलतीय "
"कळले ग, खास रिंगटोन  ठेवलाय तुझ्या साठी , रडक्या बाळाचा , हि हि "
"ए , नेहमी नेहमी काय रे तेच तेच विनोद , इकडे  राडा झालाय आणि मी जाम  कातावालीये"
" अग हो, हो जर थंड हो , काय झाले ते सांग "
" अरे यार , ह्यांनी केळवणं ची आमंत्रण घेवून ठेवली आहेत , तरी मी सांगितले होते कि जे काय असेल ते आकाश यायच्या आता संपवा . आधी त्याला तुझ्या कडे उतरवलाय , त्यात आम्ही त्याला सोडून हे असे  जायचे , केळवण खात फिरायचे , कसा तरीच वाटतय रे . तो पण  आमचा आहे कि . त्याला इकडे बोलावून मी काय केलाय चांगले कि वाईट , म्हणजे त्याला आनंद वाटतोय कि त्रास होतंय हे च काळात नाहीये रे "
"इरा , शांत हो आणि तू जा , मी  आकाश ला घेवून बाहेर जातो , ब्रेकफास्ट करतो , एक काम करीन आमच्या एक दोन दोस्ताना पण बोलावतो म्हणजे बेस्ट . आणि त्याला सांगेन मी कि तुला आता यायला जमत नाहीये "
"बरे , तू म्हणतोयेस तर तसाच करु. मी दुपारी जेवण झाले कि येते , आपण चार वाजता बाहेर पडू . चल ठेवते आता "
"हो, काळजी घे , आणि शांत पणे  घे "
इराला , आता से वाटत  होते कि आकाश ला इकडे येवून खरच आनंदी आहे न 
"इरा , आटप लवकर "
"हो , आलेच आई, पाच मिनिट "
इराचे घर पाहुण्यांनी भरले होते ,  घर माणसांनी , आनंदानी आणि वेगवेगळ्या सुगंधानी भरलेले , फुलांच्या , अत्तरांच्या , तोरणाच्या , होमाच्या , आणि वेगवेगळ्या  गोड तिखट तळप च्या वासानी  . फक्त एक गंध तिथे न्हवता , राखीचा , भाऊ बिजेच्या औक्षणाचा . पण इरानि आई बाबांना  सांगितले कि होते कि आकाश येयील आणि काही जबाबदाऱ्या  तोच पार पाडेल . खर तर घरच्यांनी पण तो आला तर हवाच होता , पण पाच वर्षात भेट नाही म्हणून कुणालाच अवघड वाटायला नको म्हणून त्याने सध्या तरी निमिष कडे राहावे असे आई ला वाटत होते . तिने इराला काल  पासून शंभर वेळा तरी , कळात नकळत त्याच्या बद्द्ल विचारले होते . इरा;ला पण ते जाणवले , पण उघड पणे   आई बाबा दोघे पण बोलणार नाहीत हे हि तुला ठावूक होते 
"इरा, अग  काय कुठे हरवली आहेस , पोचलो कि आपण . "
"काही नाही बाबा असच . आकाश आला आहे काल "
"हो माहितीये , आम्हाला . पण ग आता त्याला बोलवणे खरच शक्य नाहीये बेटा"
"शक्य आहे , पण तुम्हालाच नकोय . जावू दे . ठरल्या प्रमाणे मी संध्याकाळी त्याच्या सोबत खरेदी ला आणि मेनू ठरवायला जाणारे आहे . ती जबाब दारी त्याला द्यायची असे ठरलाय न आपले . तुम्ही येतंय का . बघ जमले तर . कमीत कमी मेनू ठरवायला तरी या "
"बघू , आता तर आता चल , आणि जास्त विचार नको करू , फक्त आनंदी राहा "
"आकाश शिवाय,  आनंदी  , हं  "- इरा 
आता नेहमी प्रमाणे आई ला मध्ये पडावेच लागले 
"इरा , बास  आता ,   हा विषय इथेच बंद कर . आकाश तुझा भाऊ आहे आणि आमचा कुणीच नाही का ? पण आता हि वेळ नाहीये . आपण घरी गेल्यावर बोलू . रागावू नको ग , पण तुझ्या कडे आता लोक आता तुझ्याकडे  नवरी म्हणून बघतात , मग तू पण छान आनंदी असायला नको का . बर तुझ्या मर्जीने तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न होतंय आणि तुला हवे तसे आकाश  पण आलाच आहे कि आता . "
" ह, कळतंय मला , चल आता  आई "
इराला वाटत होते कि निमिष नि काय सांगितलाय आकाश ला काय माहित . 
इकडे निमिष च्या घरात 
"आकाश  , चल  रे आपण बाहेर खावून येवू माझी एक दोन काम पण करायची आहेत ती पण करू "- निमिष 
" अरे पण  , इरा ?"
"तिला कळवले आहे मी . ती दुपारी ४ वाजता येयील आता ,"
'बर , चल मग "
आकाश आणि निमिष बाहेर पडले . आकाश आजूबाजूला पाहत होता . ५ वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती,  दिसली तीच हि बाग   , आणि त्याला एकदम आठवले  , असे वाटले कि इरा  आहे त्या झोपल्यावर , त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. "  आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा …… 

क्रमश : 
-- 

No comments:

Post a Comment